Yuri Alemao: 'सनबर्न'मुळेच गोवा कोरोनाच्या रूग्णांमध्ये देशात टॉपवर; युरी आलेमाव यांचा घणाघात

राज्यातील-केंद्रातील भाजप सरकार बेजबाबदार आणि अकार्यक्षम
Yuri Alemao on increasing corona in Goa:
Yuri Alemao on increasing corona in Goa: Dainik Gomantak

Yuri Alemao on increasing corona in Goa: सुरवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात फैलावल्यास जबाबदार ठरल्याचा आरोप केला आहे.

सनबर्नमुळेच गोवा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या रूग्णांमध्ये देशात टॉपवर पोहचल्याची टीका आलेमाव यांनी केली आहे.

त्यांनी यावरून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार बेजबाबदार आणि अकार्यक्षम आहे. अशा महोत्सवाच्या आयोजनातून त्यांनी कोरोनाचा प्रसार करून आपल्या चुकीच्या कामांमध्ये आणखी एका कामाची भर टाकली आहे.

Yuri Alemao on increasing corona in Goa:
Goa Air Quality: राज्यातील 40 ठिकाणी होणार हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण; 16 कोटी येणार खर्च

सर्वसामान्यांचे जगणे या सरकारने मुश्किल केले आहे. सनबर्नचा परिणाम आता दिसू लागला आहे. गोव्यात कोरोनाच्या जेएन. वन विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे.

सनबर्नचाच हा परिणाम आहे. सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो, असे आलेमाव यांनी म्हटले आहे. गोव्यात गेल्या काही दिवसांत पुन्हा कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. सध्या राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 60 इतकी झाली आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सर्वाधिक रूग्ण गोवा, बंगळूर या ठिकाणीच आढळून आले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये गोव्यात 9, 10, 13, 16 असे रूग्ण आढळून आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com