पणजी: राज्यात पावसाचा (Goa Monsoon) जोर वाढल्याने गणेशभक्तांची (Ganapati) पुरती तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. त्याशिवाय बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला. आधीच कोविड महामारी (Covid-19) आणि संचारबंदीमुळे व्यापारीवर्ग हैराण झाला असून ऐन सणात पावसाने हजेरी लावून त्यांच्या कमाईवर विरजण टाकले आहे. विशेष म्हणजे, काल सोमवारी पावसाच्या सरासरीत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात पावसाची सरासरी तब्बल आठ टक्क्यांपर्यंत घटली होती.
सांगे, केपे, वाळपईत सर्वाधिक
राज्यात सांगे, केपे, वाळपई आणि पेडणे परिसराला आज पावसाने सोमवारी अक्षरशः झोडपून काढले. सांगेत दिवसभरात 3 इंच तर केपेत 2.2 इंच पावसाची नोंद झाली. राज्यभरात 1.2 इंच पावसाची नोंद झाली. संततधारेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तसेच जे कामानिमित्त घराबाहेर पडले, त्यांना रस्त्यात साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागला. आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून ‘यलो अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे.
आतापर्यंत 116.5"
सोमवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर काही काळ उसंत घेतल्यानंतर पुन्हा पावसाने झोडपले. राज्यात आतापर्यंत 116.5" इंच पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्याने काही दिवस पावसाची रिपरिप राहील, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.