NEET Exam : पेपरफुटीमुळे नीट परीक्षा नव्याने घ्या : नौशाद चौधरी

NEET Exam : एनएसयूआयची पत्रकार परिषदेद्वारेे मागणी
NEET Exam
NEET ExamDainik Gomantak

NEET Exam :

पणजी, डॉक्टर होणे अनेकांचे स्वप्न असते, परंतु त्या स्वप्नांशी खेळण्याचा प्रकार घडत आहे. देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या नीट परीक्षेला यंदाचा पेपर बिहारमध्ये फुटल्याने परीक्षा प्रक्रियेवर संशय व्यक्त होत आहे.

देशभरातून या परीक्षेला २३ लाख विद्यार्थी बसले होते, तर गोव्यातून सुमारे ४ हजार विद्यार्थी बसले होते, परीक्षा प्रक्रियेत बिघाडामुळे दिलेले अतिरिक्त गुण आदींमुळे एकाच केंद्रात सात जणांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत, त्यामुळे नीट परीक्षा पुन्हा नव्याने आयोजित करण्यात यावी, अशी मागणी एनएसयूआयचे नौशाद चौधरी यांनी केली.

पणजीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फक्रुद्दीन मुजावर, नीरज नाईक आदी उपस्थित होते. चौधरी पुढे म्हणाले, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक पालक नीट परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी ऋण काढून कोचिंग देतात.

त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर परिणाम होतो. नीट परीक्षा ७२० गुणांची असते परंतु यंदा ६५० गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला देखील एम्स दिल्ली येथे प्रवेश मिळणे कठीण झाले आहे,

NEET Exam
Goa Crime News: पर्वरीत क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा; गुजरातच्या तिघांना अटक, 10 लाखांचे साहित्य जप्त

धरणे आंदोलनाचा इशारा

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ५२० ते ५५० गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचा. परंतु यंदा मोठ्या प्रमाणात गुण वाढल्याने गोमंतकीय विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय दिला जात नाही, तोपर्यंत आम्ही लढणार आहोत. नीट परीक्षा नव्याने घेण्यात यावी, यासाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com