Ironman 70.3 Goa: 'आयर्नमॅन'च्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; पणजीत या वेळेत 'हे' मार्ग राहणार बंद

13 नोव्हेंबर रोजी पणजी शहरातील वाहतूकीमध्ये केले बदल
Ironman 70.3 Goa
Ironman 70.3 GoaDainik Gomantak
Published on
Updated on

जागतिक दर्जाच्या ट्रायथलॉन (Triathlon) स्पर्धेचे येत्या रविवारी (दि.13) गोव्यात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 1.9 कि.मी पोहणे, 90 कि.मी सायकल चालवणे आणि 21 कि.मी हाफ मॅरेथॉन असे 113 कि.मी अंतर स्पर्धकांना पार करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर 13 नोव्हेंबर रोजी पणजी शहरातील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

(Due to IRONMAN 70.3 International Triathlon Events the traffic in Panaji has been changed)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पणजी येथील वाहतूकीतील बदल हे मुख्यत: 13 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते स्पर्धा संपेपर्यंत असणार आहे.

पोलिस प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार

1. रायबंदर ते दिवजा सर्कल हा मार्ग दुपारी 3.00 पासून ते स्पर्धा संपेपर्यंत बंद असणार आहे

2. दिवजा सर्कल ते मिरामार सर्कलपर्यंतच्या डी बी मार्गाची वाहतूक ही स्पर्धेच्या दरम्यान बंद असणार आहे.

3. मिरामार सर्कल ते डॉ. जॅक सिक्वेरा मार्ग बंद असणार आहे

4. एनआयओ सर्कल ते राजभवन मुख्य गेट पर्यंतचा मार्ग बंद असणार आहे.

Ironman 70.3 Goa
Ironman 70.3 Goa: रविवारी 'आयर्नमॅन'चा थरार; 70 गोवन ट्रायअ‍ॅथलीटस घेणार सहभाग

ट्रायथलॉन स्पर्धेतील स्पर्धकांना साडे आठ तासांचा वेळ दिला जातो. ट्रायथलॉन स्पर्धेत देश विदेशातील अनेक स्पर्धेक सहभागी होणार असून, 70 गोवन्स ट्रायअ‍ॅथलीट (Triathletes) सहभाग घेणार आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धेकाला आयर्नमॅनचा किताब दिला जातो.

Ironman 70.3 Goa
Varun Dhawan in IFFI: इफ्फीच्या ग्रँड प्रीमियरमध्ये वरूण धवनचा 'लाईव्ह' परफॉर्मन्स

काय आहे 'आयर्नमॅन'

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो. जलतरण, सायकलिंग, रनिंग हे प्रकार स्पर्धेत पूर्ण करावे लागतात. क्रीडा विश्वात आयर्नमॅन स्पर्धेला अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक स्पर्धा मानले जाते. अनेक ट्रायअॅथलीट या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com