पावसाचा जोर कमी होऊन पूरग्रस्त स्थिती नियंत्रणात आली असे वाटत असतानाच आज रात्री अचानक डिचोलीच्या बाजारपेठेत पाणी घुसले. जुन्या मार्केटातील गल्लीसह काही भाग जलमय झाला. या गल्लीतील दुकानदारांवर आकांत कोसळला. रात्रभर जोरदार पाऊस पडला. सोनारपेठेतील काही लोकांनी स्थलांतर केले.
काही दुकानदारांनी दुकानातील आपले सामान सुरक्षित ठेवण्यास सुरवात केली आहे. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्री उशिरापर्यंत शहरात अंधार पसरला होता. त्यामुळे दुकानदार चिंतेत होते. डिचोलीच्या नदीच्या पातळीने धोक्याची पातळी पार केली आहे. जुना बसस्थानक, बंदरवाडा आदी काही भागाही पाण्याखाली गेला होता.
राज्यभर पडलेल्या पावसाचा परिणाम जलमार्गावरील वाहतुकीवरही झाल्याचे दिसून आले. निम्म्याहून अधिक मार्गावरील फेरीबोट वाहतूक रविवारी बंद ठेवावी लागली. फेरीबोट लागणारे धक्के पाण्याखाली गेल्याने ही सेवा बंद ठेवणे अपरिहार्य होते.
रविवारी मोपा विमानतळाच्या आतल्या भागात पावसाचे पाणी शिरले. या प्रकारावर काँग्रेसचे नेते अमरनाथ पणजीकर यांनी नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या नरेंद्र मोदी यांची ‘गॅरंटी’ ही वॉरंटीशिवाय आहे, हे स्पष्ट झाले आहे, असे टीका त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.