'कर्तव्यदक्ष जवानांमुळे गोवा राज्याचा लौकिक वाढीस'

राज्यपाल: राजभवनावर राष्ट्रीय अग्निशमन सेवादिन
गोवा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई
गोवा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लईDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांचे स्मरण राज्याला व देशाला नेहमीच राहणार आहे. गोव्यातील अग्निशामक दलाचे जवानांचे कार्य हे उच्चपातळीवरचे असून, आपत्कालीन सेवेत त्यांनी दिलेली सेवा ही बहुमूल्य आहे. या कर्तव्यदक्ष जवानांमुळेच राज्याचा लौकीक वाढीस लागला, असे गौरवोद्‍गार राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढले.

कर्तव्यादरम्यान आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अग्निशमन जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 14 एप्रिल रोजी राज्यात राष्ट्रीय अग्निशमन सेवादिन साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यपाल पिल्लई यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना उद्देशून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

गोवा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई
गोव्यात सरकारी पाण्याची दिवसाढवळ्या चोरी

14 ते 20 एप्रिल या कालावधीत अग्निशमन प्रतिबंध सप्ताह साजरा करण्यात येत असल्याने दलाचे संचालक नितीन रायकर यांनी राज्यपाल पिल्लई यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय अग्निशमन सेवादिनाचा बॅच लावून राजभवनावर अग्निशमन सेवादिन साजरा केला.राज्यपाल पिल्लई यांनी अग्निशमन प्रतिबंध सप्ताहानिमित्त दलाच्या अधिकाऱ्यांना व जवानां शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com