Dudhsagar Waterfall: दूधसागरला जाताय? आधी ही बातमी वाचा; प्रवेश शुल्काबाबत प्रशासनाची घोषणा

Dudhsagar Waterfall Entry Fee: गोव्यात पावसाळ्यात दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. गोव्यात येणारा प्रत्येकजण दूधसागर धबधबा नक्की पाहतो.
दलालांना आळा घालण्यासाठी 'शुल्क आकारणी'! दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही; गावकरांचा इशारा
GTDC President Ganesh Gaonkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Dudhsagar Waterfall Latest Update

काणकोण: गोव्यात पावसाळ्यात दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. गोव्यात येणारा प्रत्येकजण दूधसागर धबधबा नक्की पाहतो. मात्र दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अनाठयी शुल्क वन खात्याकडून आकरले जात असल्याने गाईड्सनी आपली नाराजी व्यक्त केली होती. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही पर्यटकांना ट्रेकींगसाठी घेऊन जाणार नाही असे वन खात्यानेच नेमलेल्या गाइड्सनी सांगितले होते.

याच पार्श्वभूमीवर आता, गाईड्सनी व्यक्त केलेल्या नाराजीवर सावर्डेचे आमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गांवकर यांची प्रतिक्रिया आली आहे. आमदार गांवकर म्हणाले की, 'दूधसागर धबधब्यावर (Dudhsagar Waterfall) येणाऱ्या ट्रेकर्सकडून यंदापासून जीटीडीसी (177 रुपये) आणि गोवा वन विकास महामंडळाने (50 रुपये) शुल्क आकारणीचा निर्णय घेतला आहे.'

दलालांना आळा घालण्यासाठी 'शुल्क आकारणी'! दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही; गावकरांचा इशारा
Goa Crime News: मडकई आयडीसीजवळ म्हार्दोळ पोलिसांची कारवाई; गांजा बाळगल्याप्रकरणी एकजण गजाआड!

हे शुल्क आता पर्यटकांना (Tourist) द्यावे लागणार आहे. या शुल्क आकारणीशी गाईड्सचा काहीही संबंध नाही. या व्यवसायातील दलालांवर आळा घालण्यासाठी आणि पर्यटन सुरळीत व्हावे हाच उद्देश शुल्क आकारणीचा आहे. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही सावर्डेचे आमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गांवकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com