ड्रग्ज का दारुची नशा? झिंगलेल्या रशियन महिलेचा शिवोलीत भररस्त्यात राडा, वाहनं अडवली, पोलिसांशी घातली हुज्जत

Russian woman Goa incident: शिवोलीत रात्रीच्या सुमारास पाऊस सुरु असताना हा सगळा प्रकार सुरु असल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
Russian woman Goa incident
Russian Woman Creates Chaos in SiolimDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: शिवोलीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रशियन पर्यटक महिलेने राडा घातला. सेंट अँथनी चर्च परिसरात महिलेने वाहनं अडवून त्यांना नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ही महिला दारु अथवा अमली पदार्थाच्या नशेत असल्याचा संशय प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केला. यावेळी चर्च परिसरात वाहतूक कोंडी झाली.

समोर आलेल्या व्हायरल व्हिडिओनुसार, एक महिला सेंट अँथनी चर्च परिसरात वाहने अडवून वाहनांना नुकसान पोहोचवताना दिसत आहे. महिलेने एका कारचा वायपर तोडला तर आरशावर देखील लाथा बुक्यांनी प्रहार केला. महिलेने अनेक दुसऱ्या कारवर देखील हल्ला केला. भररस्त्यात महिलेने सुमारे एक ते दोन तास तमाशा घातला, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

Russian woman Goa incident
जल वाहतुकीसाठी राज्यात होणार आधुनिक नियंत्रण प्रणाली! 50 कोटींची गुंतवणूक; बंदरांवरील ताण होणार कमी

महिलेने यावेळी तिची समजूत काढणाच्या प्रयत्न करणाऱ्या स्थानिकांशी हुज्जत घातली. काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला रस्त्याच्या मधोमध झोपली तर अनेक वाहनांवर तर ती वर जाऊन बसली. रात्री अकराच्या सुमारास सुरु झालेला हा प्रकार पुढे किमान दोन तास सुरु असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

यावेळी एका कार चालकाने  हणजूण पोलिसांना या सर्व प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण, महिलेने पोलिसांनाही न जुमानता तिचा राडा सुरुच ठेवला. पोलिसांनी तिला पोलिस वाहनात बसण्याची विनंती केली पण त्यालाही तिने नकार दिला.

Russian woman Goa incident
Goa Crime: कोयत्याने हल्ला केला, मध्यस्थाचा घेतला चावा; मानसिक अस्वस्थतेचा दावा नाकारला, संशयितावर आरोप निश्चित

अखेर सुमारे दोन तास सुरु असलेल्या नाट्य संपले आणि पोलिसांनी १०८ रुग्णाहिका बोलवून महिलेला त्यात बसवून वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. रात्रीच्या सुमारास पाऊस सुरु असताना हा सगळा प्रकार सुरु असल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, महिलेने दारु किंवा अमली पदार्थाची नशा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com