Goa Taxi: टॅक्सीचालक, ऑपरेटर्सचे ड्रग्ज कनेक्‍शन!

Goa Taxi: एनसीबीची कारवाई : चौघांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या; दोघांना जामीन
Goa Taxi
Goa Taxi Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Taxi Drug Connection:

राज्यातील ड्रग्‍सदलालांशी तस्करीप्रकरणात रेंट ए बाईक, कॅब ऑपरेटर तसेच टॅक्सी चालकांचेही लागेबांधे असल्याचे नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्‍या (एनसीबी) गोवा विभागाने केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी किनारपट्टी परिसरातून नायजेरियन तस्कराच्या पत्नीसह चौघांना अटक केली होती. त्यातील दोघांना न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या गुप्तहेराच्या माहितीद्वारे साळगाव येथील राजू साळगावकर या रेंट ए बाईक ऑपरेटरला ताब्यात घेऊन त्याच्याकडून कोकेनची पाकिटे जप्त केली.

त्याच्या चौकशीतून हे ड्रग्‍स त्याने नायजेरियन इवुआला उडोका स्टॅन्‍लीकडून खरेदी केल्‍याचे सांगितले. हा स्टॅन्‍ली गोव्यात टॅक्सीचालक, रेंट ए बाईक व कार ऑपरेटर्सना हाताशी धरून ड्रग्‍स तस्करीचे नेटवर्क चालवत असल्याची माहिती मिळाली होती.

Goa Taxi
Talegaon Illegal Construction: आल्मेदाच्या मालमत्तेतून थकबाकीची वसुली करू

अधिक चौकशीत एनसीबीने कांदोळी येथील फर्नांडिस नामक दोन भावडांची चौकशी केली केली असता मायकल याला अटक केली. त्याची चौकशी केली असता, स्टॅन्लीची पत्नी सिमरन ऊर्फ चंदेलचा ड्रग्‍स व्यवहारातील सहभाग समोर आला.

2 आठवड्यापूर्वी अटक

ड्रग्‍स तस्करीप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्यांपैकी राजू साळगावकर (साळगाव) व मायकल फर्नांडिस (कांदोळी) या दोघांना म्हापसा येथील एनडीपीएस विशेष न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. या दोघांनाही दोन आठवड्यांपूर्वी अटक झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com