Drug Accused Arrested : थिवीत पोलिसांची धाड; ड्रग्स बाळगल्याप्रकरणी ओडिशातील एकाला अटक

आज कोलवाळ पोलिस स्टेशनचे पीएसआय सुशांत सांगोडकर यांच्या नेतृत्वाखाली थिवीमध्ये अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी धाड टाकण्यात आली.
Drug Accused Arrested
Drug Accused Arrested Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गोवा पोलीस प्रशासन आणि अबकारी खाते नेहमीच सतर्क असते. आज कोलवाळ पोलिस स्टेशनचे पीएसआय सुशांत सांगोडकर यांच्या नेतृत्वाखाली थिवीमध्ये अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी धाड टाकण्यात आली.

Drug Accused Arrested
Goa Environment: 'निसर्गाचे रक्षण करणे म्हणजेच स्वरक्षण'

थिवीमधील चॅपलजवळ छापा टाकून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बापून बरीक (25, मोले भट, मूळ ओडिशा). यामधून 515 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत 51500 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत.

NDPS कायदा 1985 च्या कलम 20(b) ii (A) अन्वये अटक करण्यात आलेला हा आरोपी आणि सध्या पोलीस कोठडीत आहे. उत्तर गोव्याचे एसपी निधीन वल्सन यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

अशीच घटना कालही घडली होती. आगशी पोलिसांनी आगशी येथे छापा टाकून मनीष कुमार (वाराणसी - मध्यप्रदेश) याला अटक करून त्याच्या कडून 1.50 लाखांचे ड्रग्ज जप्त केल्याची घटना घडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Colvale Police Arrest 29 Year Old
Panaji Cocaine Seizure Case
Jharkhand Native Arrested With Drugs In Goa
Vagator Beach Hostel Drug Racket
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com