Goa Environment: निसर्गाचा आपण विचार करतो तेव्हा आरोग्याचा संबंध त्याच्याशी येतो. ऐशी टक्के औषध कंपन्या निसर्गावर अवलंबून आहेत. निसर्गाचे रक्षण करणे म्हणजे स्वतःचे रक्षण करण्यासारखे आहे, असे प्रतिपादन जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी येथे केले.
अभिव्यक्ती पणजीतर्फे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी), जैवविविधता मंडळ गोवा आणि राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांच्या सहयोगाने येथील आयएमबी सभागृहात शनिवारी युवा जागृती महोत्सवात डॉ. सरमोकादम हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आयएमबीचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर व अभिव्यक्ती च्या सचिव गीता मंगेशकर उपस्थित होत्या.
दरम्यान, स्वप्नील फडणीस यांनी सूत्रसंचालन केले. पारितोषिक वितरण सोहळ्यास पर्यावरण रक्षा चळवळीतील व्यासंगी नेते राजेंद्र केरकर व आयएमबीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी दशरथ परब उपस्थित होते. राजेंद्र केरकर यांनी, युवकांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले.
आपल्या देशाचा समृद्ध वारसा व पर्यावरण रक्षण करा असे आवाहन केले. दशरथ परब यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. चैत्रा देशपांडे हिने स्पर्धांचा निकाल जाहीर केला.
ऑफलाईन स्पर्धांचा निकाल
पोस्टर बनवणे स्पर्धा- प्रथम-सर्वोदय एज्युकेशन विद्यालय, द्वितीय- एमआयबीके विद्यालय, तृतीय-चबी चिक्स विद्यालय, उत्तेजनार्थ-मुष्टिफंड विद्यालय परीक्षक : सागर गावडे व अनघा निनाद देशपांडे. पर्यावरणीय समूह गीतगायन स्पर्धा- प्रथम-न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट, द्वितीय-सर्वोदय एज्युकेशन सोसायटी विद्यालय, तृतीय-डॉ.के. ब. हेगडेवार विद्यालय, उत्कृष्ट पर्यावरणगीत रचना-विनायक दामोदर विद्यालय. परीक्षक : नितीन कोरगावकर, आसावरी कुलकर्णी व राखी भिडे.
पथनाट्य स्पर्धा-प्रथम-जिवि एम दादा वैद्य विद्यालय द्वितीय-सर्वोदय एज्युकेशन विद्यालय, तृतीय- प्रकृती कला मोगी. परीक्षक : शितल गायतोंडे व अविनाश च्यारी.
ऑनलाइन स्पर्धांचा निकाल
लघुपट -प्रथम- नेहाल हरिश्चंद्र च्यारी, द्वितीय-गोपिका कृष्णनन, तृतीय-ओंकार पेडणेकर. परीक्षक : साईनाथ उसकैकर व यशोधन गडकरी.
रिल मेकिंग-प्रथम-ज्युड फर्नांडिस, द्वितीय-वैष्णवी झो, तृतीय-नेहाल साळकर. परीक्षक :सबिता कुडतरकर. छायाचित्र स्पर्धा-प्रथम-सत्यकी आचार्य, द्वितीय-शिबासिस सहा, तृतीय-रथीन डे. परीक्षक : विजय रामनाथन व राजेश नाडकर्णी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.