डिचोली: चतुर्थीचा उत्साह द्विगुणित करताना सर्व गणेशभक्तांनी 'कोविड' नियमांचे (Covid 19) पालन करून सुरक्षित काळजी घ्यावी. असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चतुर्थीनिमित्त समस्त गोमंतकियांना केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी आपल्या मूळ कोठंबी-पाळी येथील निवासस्थानी आपल्या कुटुंबियांसमवेत मंगलमूर्ती गणपती बाप्पाचे पूजन केले.
गणपती बाप्पाचे पूजन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी गणेशभक्तांना 'चवथी'च्या शुभेच्छा देताना भारत देशासह संपूर्ण जग 'कोविड'मुक्त व्हावे. अशी विनंती विघ्नहर्त्या गणरायांपाशी केली. लसीकरणाचा पहिला डोस घेण्यासाठी ज्यापद्धतीने सर्वांनी प्रतिसाद दिला, त्याचप्रमाणे प्रतिसाद देवून सर्वांनी दुसरा डोस घेवून पूर्ण लसीकरण (Vaccination) केलेले राज्य असे जाहीर करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. गोवा (Goa) राज्याची स्वयंपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असून, या चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांनी राज्य स्वयंपूर्तीचा संकल्प करावा. असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.