Goa: गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरले

देशातील विद्यापीठांच्या मानांकनात गोवा विद्यापीठांचे (Goa university ) मानांकन घसरले असून, ते 96 वर पोहचले आहे.
Goa university rank in all India at 96th position
Goa university rank in all India at 96th position Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र सरकारच्या (Central Government) माहिती व तंत्रज्ञान (IT Department) खात्याद्वारे जारी करण्यात आलेल्या देशातील विद्यापीठांच्या मानांकनात गोवा विद्यापीठांचे (Goa university ) मानांकन घसरले असून, ते 96 वर पोहचले आहे. यावर्षीच्या तुलनेत मागील वर्षी ते 81 वर होते. (Goa university rank in all India at 96th position)

नव्याने जारी झालेल्या यादीनुसार, आयआयटी मद्रासला सर्व विभागात उच्च मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या विभागात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळूर कर्नाटक विद्यापीठाला 82.67गुणासह पहिले मानांकन मिळाले आहे. 38.96 गुणासह गोवा विद्यापीठाला 96 वे मानांकन मिळाले आहे.

Goa university rank in all India at 96th position
Goa Politics: काँग्रेसच्या आणखी १० गट अध्यक्षांची नियुक्ती

तंत्रज्ञान विभागात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रासला 90.19 गुणांसह पहिले मानांकन तर 40.60 गुणासह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फोंडाला 85 वे मानांकन मिळाले तर फार्मसी विभागात जामिया हमदर्द दिल्लीला 78.52 गुणांसह पहिले मानांकन तर गोवा कॉलेज ऑफ फार्मसीला 42.13 गुणासह 56 वे मानांकन प्राप्त झाले आहे. या विषयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी गोवा विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कार्यकारी कुलगुरू तसेच कुलसचिव रजेवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sattari River Drowning Cases
Mandrem Police Investigation
Bicholim Class 11 Admissions
Russian Woman Marriage Registration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com