Caisua Drowning: आंघोळीसाठी केरळचे दोघे पाण्यात गेले अन् बुडणाऱ्या पर्यटकाच्या मदतीला धावला मच्छिमार

कायसुव येथे केरळ येथील दोन पर्यटक पोहण्यासाठी पाण्यात गेले आणि त्यातील एक पाण्यात बुडू लागला.
Caisua Drowning Case
Caisua Drowning CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Caisua Drowning Case: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा अतिउत्साहीपणा कधी कधी त्यांच्याच अंगलट येत असतो. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर नेहमीच विविध अपघात घडतात. समुद्राच्या पाण्यात पोहताना अनेकवेळा अपघात झाल्यानंतर, त्यातून बचाव करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने दृष्टी या संस्थेकडे बचावकार्य करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान, कायसुव (Caisua) येथे केरळ येथील दोन पर्यटक पोहण्यासाठी पाण्यात गेले आणि त्यातील एक पाण्यात बुडू लागला.

(Drowning Kerala tourist at Caisua Goa saved by fisherman)

मिळालेल्या माहितीनुसार, केरळ येथील दोन पर्यटक कायसुव येथे पोहण्यासाठी पाण्यात गेले. खोल पाण्यात गेल्याने एक पर्यटक माघारी परतला तर एकजण पाण्यात बुडू लागला. दरम्यान, बुडणाऱ्या पर्यटकाच्या मदतीला शिवोली येथील एक मच्छिमार धावला.

राजाराम चोडणकर असे या बचावकार्य करणाऱ्या मच्छिमाराचे नाव आहे. चोडणकर याने प्रसंगावधान दाखवत केरळच्या बुडणाऱ्या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले. या धाडसाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Caisua Drowning Case
Goa Beach: मद्य सेवन, सूचनांकडे दुर्लक्ष; वर्षात कळंगुट आणि बागा समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक बचावकार्य

वर्षात कळंगुट आणि बागा समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक बचावकार्य

दृष्टी मरीन एजन्सीने जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान, कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर 167 बचावकार्ये करण्यात आले. तर, बागा समुद्रकिनाऱ्यावर 113 बचावकार्य करण्यात आली. याशिवाय उत्तर गोव्यातील हरमल (43), मोरजी (29) आणि वागातोर (24) बचावकार्याच्या घटना घडल्या आहेत.

याच कालावधीत दक्षिण गोव्यात पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर 25 बचावकार्याच्या घटना घडल्या असून, त्यापाठोपाठ कोलवा येथे 18, बानावलीत 06, आगोंद आणि केळशी येथे प्रत्येकी पाच बचावकार्याच्या घटना नोंदवल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com