Drone
DroneDainik Gomantak

Goa Police : गोवा पोलिसांच्या ताफ्यात मार्चमध्ये दाखल होणार तीन ड्रोन

गोवा पोलिसांनी सुमारे 60 लाख रुपये खर्चून तीन ड्रोन खरेदी केले
Published on

Goa Police : राज्यात होत असलेल्या अपघातांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून बेशिस्त वाहन चालकांविरोधात मोहीम सुरू केली आहे. गत दहा दिवसांत उत्तर गोव्यात 3522 बेशिस्त चालकांविरुद्ध दंडाची कारवाई केली आहे.

दरम्यान, यापुढे वाहतूक व गर्दी व्यवस्थापन तसेच पाळत ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे. याकरिता तीन ड्रोन सरकारने मंजूर केले आहेत. पुढील दीड महिन्यात ड्रोन उपलब्ध होणार आहेत.

Drone
Pernem Police : पेडण्यातून ताब्यात घेतलेल्या रशियन पर्यटकाचा मृत्यु; पोलिस म्हणतात...

सरकारने ड्रोन बाबत पुढाकार घेतल्याने उत्तर गोवा पोलिस अधिक्षक निधीन वाल्सन यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तसेच या बदलाचे शिल्पकार हे मुख्यमंत्री सावंत असल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले.

ट्विटमध्ये वाल्सन म्हणाले, गोवा पोलिस ड्रोन खरेदी करून आधुनिकीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहेत. या हालचालींमुळे आम्हाला आपत्कालीन परिस्थितीला अधिक जलद प्रतिसाद देता येईल आणि अधिक चांगल्या नागरिक केंद्रित सेवांची खात्री होईल असे म्हणाले.

Drone
गोमंतकीयांची स्थिती आगीतून फुफाट्यात! जलप्राधिकरण म्हणजे कर्नाटकला पाणी वळवू देण्याचा परवानाच

वाहतूक व्यवस्थापनासाठी गोवा पोलिसांनी सुमारे 60 लाख रुपये खर्चून तीन ड्रोन खरेदी केले आहेत. ड्रोनच्या तैनातीमुळे पोलिसांना वाहतूक ड्युटीवरील कर्मचार्‍यांची संख्या कमी करण्यास संसाधने चांगल्या प्रकारे वापरण्यास मदत होईल. हे ड्रोन मार्चमध्ये गोवा पोलिसांच्या ताफ्यात सामील होणार आहेत.

एकदा ड्रोनने वाहतुकीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली की रस्त्यावरील पोलिसांची तैनाती कमी होणार आहे असे पोलिस खात्यामार्फत सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com