Pernem Police : पेडण्यातून ताब्यात घेतलेल्या रशियन पर्यटकाचा मृत्यु; पोलिस म्हणतात...

पेडणे पोलिसांनी एका रशियन नागरिकाला ताब्यात घेतले होते.
Death Body
Death Body Dainik Gomantak

Pernem Police : पेडणे पोलिसांनी एका रशियन नागरिकाला परिसरात गोंधळ घातल्याबद्दल ताब्यात घेतले होते. या नागरिकाचा बांबोळीतील मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेमध्ये नेत असताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Death Body
MLA Disqualification Petition : सभापती पद हे संविधानिक पद, न्यायालय निर्देश देवू शकत नाही - तवडकर

याबाबत अधिक माहिती अशी की, पेडणे पोलिसांनी एका रशियन नागरिकाला परिसरात गोंधळ घातल्याबद्दल ताब्यात घेतले होते. त्याला पोलिसांनी सुरुवातीला तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. यावेळी रशियन नागरिकाने तेथे खूप हिंसक वर्तवणूक केली होती.

त्यानंतर पीएचसीने आयपीएचबीकडे पाठवले होते. यानंतर रशियन नागरिकाला बांबोळीतील मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेमध्ये नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

मृत रशियन नागरिकाच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिस खात्याकडून सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com