तीन दिवसांपूर्वी गोवा राज्य सरकारने ॲप आधारित टॅक्सीसाठी सकारात्मकता दर्शवत या सेवेेला मंजुरी दिली असल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात गोव्यात ओला, उबर सारख्या कंपन्या उतरण्यासाठीचे दरवाजे खुले केले आहेत. त्यामूळे स्थानिक चालकांनी याला विरोध केला आहे. (Drivers oppose app-based taxi service in Goa )
गेले काही दिवस राज्यात टॅक्सी मीटरवरुन राजकिय पटलावर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या चर्चांमध्ये काही नेत्यांनी याला विरोध केला आहे. तर काही भाजप आणि मित्र पक्षांनी याचे समर्थन केले आहे. याबाबत बोलताना टॅक्सी सेवेसाठी जाणीवपूर्वक मीटरचा वापर केला जात नाही. असे निरीक्षण गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा अधिवेशनात नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी ॲपवर आधारित टॅक्सी सेवेसाठी सर्वांनी समर्थन देणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले होते.
टॅक्सी चालक संघटनेने आपला विरोध तीव्र केला
यानंतर टॅक्सी चालक संघटनेने आपला विरोध तीव्र केला आहे. हा विरोध करताना गोवा सरकारने घालून दिलेल्या अटी आम्ही काटेकोरपणे पाळू मात्र राज्य सरकारने टॅक्सी मीटरवरुन घेतलेला निर्णय मागे घ्यावा असे मत यावेळी सर्वानुमते मांडले आहे.
त्यामूळे राज्य सरकार हा निर्णय मागे घेणार की टॅक्सी चालक संघटनेला आपली भुमिका बदलावी लागणार हे पाहावे लागणार आहे. तसेच सध्या टॅक्सी चालक संघटनेने आपला हा लढा तीव्र करण्याबाबत कोणती ही भुमिका स्पष्ट केलेली नाहीये. त्यामूळे याला विरोध करण्यासाठी टॅक्सी चालक संघटना काय निर्णय घेणारे हे पाहणे महत्चाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.