इंधनाच्या भडक्याने गोव्यातील वाहनचालक होरपळले

नाराजीचा सूर: महागाई कमी करा किंवा सवलत देण्याची मागणी
petrol diesel price hike
petrol diesel price hike Dainik Gomantak

फातोर्डा: गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेल्या इंधन दरवाढीचा जबरदस्त फटका मोटरसायकल पायलट, रिक्षाचालक, टुरिस्ट टॅक्सी तसेच मालवाहू रिक्षा व्यावसायिकांना बसत आहे. त्यांना पूर्वीच्याच दराने भाडे मारावे लागत असल्याने खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसेनासा झाला आहे. त्यामुळे सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी किंवा त्यात सवलत तरी द्यावी, अशी मागणी मडगावातील व्यावसायिक करू लागले आहेत.

petrol diesel price hike
बार्देशातील साई सेवाधामचा शुक्रवारी वर्धापनदिन

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आत्ता कुठे दिलासा मिळाला होता. गाडी रुळावर येतेय, असे वाटत असतानाच गेल्या 15 दिवसांत आठ वेळा इंधन दरवाढ झाल्याने भ्रमनिरास होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटूलागल्या आहेत.

यासंदर्भात बोलताना प्रवासी भाडे मारणारे रिक्षाचालक सुदेश बोरकर म्हणाले, रशिया येथून क्रूड ऑइल आपल्या देशात आयात करण्यात येत आहे. तरीही इंधनाचा दर सतत वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ही दरवाढ करून सामान्य माणसांचे हित जपण्याविरुद्ध पुढचे पाऊल टाकले आहे.

petrol diesel price hike
बैलपार नदीवरील पंप हाऊसचे काम सुरूच

कोरोनामुळे मागील दोन वर्षे बेकारीत गेली. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असताना इंधन दरवाढ आमचा रोजचा घासही हिरावून घेऊन जात आहे, असे सांगून रिक्षा व्यावसायिक नारायण नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

घरी चार लोक खाणारे आहेत. स्टॅण्डवर गेल्यास दिवसाला एक-दोन भाडी मिळतात. त्याच मिळकतीवर घर कसेबसे चालते. आता झालेल्या इंधन दरवाढीमुळे दिवसाला दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्‍किल होईल, असे मोटरसायकल पायलट अल्ताफ इब्राहिम म्हणाले.एकूणच गाडीची देखभाल करणे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड होऊन बसले अाहे. त्यामुळे सरकारने त्याचा विचार करावा व सवलत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com