बैलपार नदीवरील पंप हाऊसचे काम सुरूच

स्थानिकांचा विरोध: बैलपार परिसरातील शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार
 Bailpar river
Bailpar riverDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: बैलपार कासारवर्णे नदी किनारी भागात जलसिंचन खात्यातर्फे एकूण 27 कोटी रुपये खर्च करून पंप हाऊसचे काम गतीने सुरू झाले. हे काम बेकायदा असल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला असून त्यांनी पोलिसात तक्रार नोंद केली. या प्रकल्पाचे काम बंद करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु या कामासाठी पंचायतीच्या ना हरकत दाखल्याची गरज नसल्याचे जलसिंचन खात्याचे अभियंता देशपांडे यांनी सांगितले.

 Bailpar river
मान्‍सूनपूर्व कामे पूर्ण करा; रमेश तवडकरांचा निर्देश

कासारवरर्णे पंचायत क्षेत्रात बैलपार नदी आहे. या नदीच्या दोन्ही बाजूना शेकडो बागायतदार या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शिवाय याच नदीचे पाणी चांदेल प्रकल्पाला घेऊन प्रक्रिया करून ते पूर्ण तालुक्यासाठी पाठवले जाते. आता जलसिंचन खाते अंतर्गत 27 कोटी रुपये खर्च करून या नदीवर 2 पंप हाउस बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातून पाणी मोपासाठी वापरण्यात येणार आहे.

सरपंच रमेश पालयेकर म्हणाले, या प्रकल्पाचे काम करताना पंचायतीला विश्वासात घेतले नाही, पंचायतीचा ना हरकत दाखलाही विभागानेघेतला नाही. परंतु या प्रकल्पाचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वी झाले होते.

कासारवर्णे बैलपार नदीची पाणी पातळी मार्च महिन्यानंतर कमी होते आणि परिसराच्या नदीच्या दोन्ही बाजूना बागायती शेती आहेत, त्यात पोफळी, केळी मिरच्या इतर विविध प्रकारची शेती शेतकरी घेतात त्यांना या नदीचे पाणी मिळत नसल्याच्या काही तक्रारी आहेत. पाण्याची पातळी घटत असल्याने पंपाद्वारे पाणी घेताना अडचणी येतात, असे शेतकरी अनेक वेळा आपल्या कैफियती मांडत असतात. पण या मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या नदीचे पाणी इतरत्र वळविण्यात शेती बागायतदारांचा विरोध आहे. या कामामुळे बैलपार पुलाच्या कठड्याना धोका निर्माण झाला असून अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहेत. शिवाय अर्ध्याअधिक नदीत मातीचा भराव टाकण्याचा प्रकार सुरू आहे.

‘तिळारी’मुळे पाणी वाढते

दरवर्षी पावसाळ्यात बैलपार नदीला महापूर येतो, त्यात भर पडते ती तिळारीचे पाणी भरल्यानंतर सोडले गेल्यानंतर. त्या दिवशी तर पूर्ण बैलपार पूल परिसरातील घरांना धोका संभवत असतो. मुख्य रस्ता पाण्याखाली जातो. लोकांचा संपर्क तुटतो, काही लोकांना पूरग्रस्त भागातून हलवावे लागते. नदीवर जो जुना बंधारा आहे, तेथे वाहून येणारी लाकडे अडकतात आणि पाणी रस्त्यावर येते.

 Bailpar river
गोव्यातील हर्षा, ओंकार, गार्गी अभंग स्पर्धेत प्रथम

आंदोलनाचा इशारा

उदय महाले आणि श्री. गाड म्हणाले, अगोदर शेतकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा नदीतून जलसिंचन खात्याने करावा. भविष्यात या नदीचे पाणी वळवले तर चांदेल प्रकल्पासाठीसुद्धा पाणी मिळणार नाही. शिवाय पूर्ण पेडणे तालुक्यावर जलसंकट निर्माण होणार आहे. या नदीचे पाणी पेडणे तालुक्यात होऊ घातलेल्या गेमिंग झोन मोपा एअरपोर्ट, आयुष हॉस्पिटल या प्रकल्पासाठी वळविण्याचा डाव असल्याचा शेतकऱ्यांनी दावा केला आहे. सरकारने जर याचा फेरविचार केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com