डीआरआयची मोठी कारवाई, 3.5 कोटी किमतीचे सोने तस्करी करणाऱ्या मास्टरमांइडला गोव्यात अटक

Navin Kumar Ramalingam Arrested: या टोळीच्या प्रमुखाचे नाव नवीन कुमार रामलिंगम असून आता तो अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. डीआरआयने या प्रकरणी रामलिंगमला ट्रान्झीट रिमांडवर बंगळुरुला नेले आहे.
Gold
GoldDainik Gomantak

Navin Kumar Ramalingam Arrested: वेरे-पिळर्ण येथील एका व्हिलावर छापेमारी करुन केंद्रीय महसूल संचालनालयाच्या गोवा आणि बंगळुरु येथील विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टीमने सोने तस्करी करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक केली केली आहे. या टोळीच्या प्रमुखाचे नाव नवीन कुमार रामलिंगम असून आता तो अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. डीआरआयने या प्रकरणी रामलिंगमला ट्रान्झीट रिमांडवर बंगळुरुला नेले आहे. रामलिंगम याची ही टोळी थायलंडमधून सोने, चांदीची तस्करी करत होती. आता डीआरआयने या टोळीकडून 3.5 कोटी किमतीचे 4.5 किलो सोने, चांदी आणि मोठ्याप्रमाणात विदेशी चलन जप्त केले आहे.

दरम्यान, डीआरआयला गुप्तहेरांकडून सोन्या-चांदीची मोठ्याप्रमाणात तस्करी होत असल्याची टीप मिळाला होती. या टीपच्याच आधारे डीआरआयने 22 डिसेंबर 2023 रोजी बंगळुरु येथील कैम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्लॅन आखला होता. त्याचवेळी, बॅंकॉकहून आर. इंद्रायणी आणि महेश्वरी रामलिंगम या मायलेकीवर संशय आल्याने डीआरआयने त्यांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांच्याकडून 1.10 कोटी किमतीचे 1.6 किलो सोने जप्त करण्यात आले. त्यानंतर या मायलेकींना अधिक चौकशी करण्यासाठी डीआरआयने ताब्यात घेतले. मुलानेच आपल्या बॅंकॉकची सफर करुन येण्यासाठी पाठवल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मात्र आम्हाला सोन्याच्या तस्करीबाबत काही एक कल्पना नव्हती असा खुलासा त्यांनी डीआरआयच्या टीमसमोर केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याचदरम्यान अधिक चौकशी करत असतानाच डीआरआयने त्यांच्या बंगळुरुमधील घरावर छापा टाकला. या छापेमारीत डीआरआयने 1 कोटी किमतीचे 1.4 किलो सोने, चांदी आणि विदेशी चलन जप्त केले.

Gold
Goa CM Pramod Sawant: कर्नाटकात लय जबरा फसले सीएम सावंत; अचानक हॉटेलची लिफ्ट बंद झाल्यानं उडाली भांबेरी

दुसरीकडे, गुप्तहेरांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयने 17 मार्च 2024 रोजी पुन्हा एकदा असाच सापळा रचून कैम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॅंकॉकहून येत असेल्या दीपक कुमार यू, नागेंद्र कृष्णा, शिंधू कुलकर्णी आणि वेदावथी नागप्पा या चार जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी त्यांच्या चौकशीदरम्यान तब्बल 1.10 कोटी किमतीचे 1.6 किलो सोने त्यांच्याकडून डीआरआयने जप्त केले. या जप्तीनंतर डीआरआयने त्यांना ताब्यात घेतले. त्याचवेळी, या चौघांची डीआरआयने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. चौकशीदरम्यान त्यांनी नवीन कुमार म्हणून नामक व्यक्तीने आपल्याला बॅंकॉकला पाठवल्याची माहिती दिली. त्यानंतर या सोने तस्करी प्रकरणात डीआरआयने अटक केलेल्या 6 जणांना न्यायालयाने 25 मार्च 2024 रोजी सशर्त जामीन मंजूर केला.

त्याचवेळी, मुख्य सूत्रधार असणाऱ्या नवीन कुमारच्या ठिकाणावर छापेमारी केली असता 10 लाख किमतीचे विदेशी चलन, सोने, चांदी आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. याचरम्यान नवीन जखमी झाल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या ट्रान्झीट रिमांडसाठी पणजीस्थित प्रथमवर्ग कोर्टात त्याला हजर करण्यात आले. कोर्टात नवीनने आपल्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून मारहाण केल्याचा जबाब नोंदवला. यावेळी कोर्टात डीआरआयच्या बाजूने विशेष सरकारी वकिल रवीराज चोडणकर यांनी बाजू मांडली. चोडणकर म्हणाले की, नवीन पहिल्या मजल्यावरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जखमी झाला. या संदर्भात चोडणकर यांनी साक्षीदारांची साक्ष कोर्टासमोर ठेवली. त्यानंतर प्रथमवर्ग कोर्टाच्या न्यायमूर्ती मनिषा नार्वेकर यांनी संशयित नवीन कुमार रामलिंगम याला दोन दिवसांचा ट्रान्झीट रिमांड मंजूर केला. त्यानंतर डीआरआयची टीम नवीनला बंगळुरुला घेऊन गेले.

Gold
CM Pramod Sawant: प्रमोद सावंत यांच्यासह त्यांच्या पत्नीला अटक करा; काँग्रेसनंतर आता आपची मागणी

दरम्यान, नवीन तीन वेगवेगळ्या क्रमांकासह मोबाईल फोन वापरत असल्याचेही समोर आले. संशयितांशी संपर्क साधण्यासाठी तो हे फोन वापरत होता. त्यानंतर पुढे जात डीआरआयने मोबाईल क्रमांकाविषयी अधिक चौकशी केली असता टोळीचा म्होरक्या गोव्यातून सोने तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले.

Gold
Goa CM Pramod Sawant: प्रमोद सावंत यांच्या नावे रेकॉर्ड, घटकराज्य झाल्यानंतरचे ठरले पहिलेच मुख्यमंत्री

दुसरीकडे, ही धक्कादायक माहिती समोर येताच डीआरआयच्या बंगळुरु विभागाने गोवा विभागाचे एक टीम तयार केली. या टीममध्ये एस, पवन जयस्वाल आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी 6 एप्रिल 2024 रोजी नवीनच्या पिळर्ण-वेरे येथील एका प्लॅटवर छापेमारी केली. मात्र यादरम्यान प्लॅटचे दार उघडण्यास आणि सहकार्य करण्यास नकार देत या टीमला खेळवत ठेवले. याचदरम्यान नवीन पहिल्या मजल्यावरुन उडी पळून जात असतानाच त्याचा पाठलाग करुन टीमने ताब्यात घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com