G20 Summit In Goa 2023: भविष्यातील आरोग्य विषयक पायाभूत सुविधांसाठी सकारात्मक वाटचाल - आरोग्यमंत्री मांडवीय

डॉ. मानसुख मांडवीय यांनी यावेळी आमंत्रित केलेल्या जी-20 सदस्य देशांतील सर्व प्रतिनिधींचे कौतुक केले.
G20 Summit In Goa 2023
G20 Summit In Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

G20 Summit In Goa 2023: गोव्यात सुरु असलेल्या दुसऱ्या जी-20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीच्या समारोप सत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांचे आज मुख्य भाषण झाले.

"जी 20 आरोग्य कार्य गट म्हणून, आम्ही भविष्यातील जागतिक आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि व्यवस्था यासाठी संयुक्तपणे सकारात्मक वाटचाल करत आहोत", असे, डॉ. मानसुख मांडवीय यावेळी म्हणाले.

डॉ. मानसुख मांडवीय यांनी यावेळी आमंत्रित केलेल्या जी-20 सदस्य देशांतील सर्व प्रतिनिधींचे कौतुक केले. भारताने प्रस्तावित केलेल्या आरोग्यविषयक प्राधान्यक्रमांशी इतर सदस्य देश, आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचे प्राधान्यक्रम सुसंगत केले आहेत, याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनीही या सत्रात भाषण केले.

कोविड-19 महामारीचा, जगभरातील आरोग्यव्यवस्थांवर झालेला परिणाम अधोरेखित करत, डॉ. मांडवीय म्हणाले, "आता भीती आणि दुर्लक्ष अशा दोन्हीचे चक्र भेदण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे. कोरोनाचा सामना करतांना आलेला थकवा, आपल्या महामारीविरुद्धच्या सज्जतेला, प्रतिबंध आणि प्रतिसादाच्या तयारीत अडथळा ठरणार नाही, यांची काळजी आपण घ्यायला हवी. इटली आणि इंडोनेशियाच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात, या सज्जतेला दिलेली गती कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीची सज्जता, प्रतिबंध आणि प्रतिसाद वाढवण्यासाठी आजवर झालेल्या प्रयत्नांना अधिक ठोस स्वरूप देण्याचे प्रयत्न भारत करत आहे." असेही ते पुढे म्हणाले.

G20 Summit In Goa 2023
G20 Summit 2023 In Goa: 'वैद्यकीय पर्यटनासाठी भारत नेहमीच अग्रेसर'; गोव्यातील G20 बैठकीच्या पहिल्या दिवशी काय झालं?

वैद्यकीय प्रतिकार विषयक उपाययोजनांसाठी औपचारिक स्वरूपाच्या जागतिक समन्वय यंत्रणेची गरज असल्याचे डॉ. मांडविया यांनी अधोरेखित केले. तसेच या आणि वैद्यकीय काउंटरमेझर्स (MCM) म्हणजेच प्रतिकारविषयक अजेंडयावर एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत, असेही म्हणाले.

आरोग्य सेवा वितरणामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, जगभरातील डिजिटल तफावत कमी करण्यासाठी आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल आरोग्य आणि नवोन्मेष विषयक अजेंडा मांडला आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती पवार म्हणाल्या की, भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचा आधार 'वसुधैव कुटुंबकम्' या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आहे.

सर्वांना परवडणाऱ्या दरात आणि समान उपलब्धता तसेच अधिकार आणि आणि देशांच्या सीमा ओलांडून लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा देणारी आरोग्य सेवा प्रणाली तयार करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com