Sunburn Goa 2023: आजारी मुलांवर परिणाम नको!

Sunburn Goa 2023: या फेस्टिव्हल परिसरात आजारी मुले असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होणार असल्याचा हस्तक्षेप अर्ज सादर करण्यात आला आहे. त्यावरही सरकारला विचार मांडण्यास सांगितले आहे.
Sunburn Festival
Sunburn FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Sunburn Goa 2023: वागातोर येथे 28 ते 30 डिसेंबर या काळात होणाऱ्या सनबर्न ईडीएम फेस्टिव्हलवेळी ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गुरुवार, 21 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत उपाययोजनांचा कृतिआराखडा सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे.

Sunburn Festival
Goa Student: मडगावी ‘एआय’चा आविष्‍कार; आता विद्यार्थ्यांना शिकविणार रोबोट

या फेस्टिव्हल परिसरात आजारी मुले असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होणार असल्याचा हस्तक्षेप अर्ज सादर करण्यात आला आहे. त्यावरही सरकारला विचार मांडण्यास सांगितले आहे.

डेस्मंड आल्वारिस याच्या ध्वनी प्रदूषणासंदर्भातील जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने सरकारला ध्वनी प्रदूषणासंदर्भात कोणती उपाययोजना करणार त्याचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले होते.

यावेळी ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी हा आराखडा सादर केला नसल्याची माहिती दिली. सरकारने न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष विभाग निर्माण करून समिती स्थापन केली आहे.

या समितीने बुधवारी सनबर्न होणाऱ्या ठिकाणी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली असून ती उद्यापर्यंत (गुरुवारी) अहवाल सादर करेल, असे सांगितल्याने ही सुनावणी उद्यापर्यंत न्यायालयाने तहकूब केली.

पर्यटन खात्याने तात्पुरता परवाना देताना सुमारे २८ अटी पूर्ण करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे त्या अटींचे पालन करून हा महोत्सव आयोजित केला जाईल, अशी माहिती आयोजकांच्या वकिलांनी खंडपीठासमोर दिली.

जे काही परवाने व प्रमाणपत्रे आवश्‍यक आहेत, तसेच ज्या काही गोष्टी अटीमध्ये घातल्या आहेत, त्या २८ पूर्वी पूर्ण केल्या जातील, अशी तोंडी हमी दिली.

यावेळी वागातोर भागातील आजारी असलेल्या काही ज्येष्ठ नागरिक व ऑटीजम मुलांवर या सनबर्न महोत्सवाच्या कर्कश आवाजाचा परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यासंदर्भात हस्तक्षेप अर्ज सादर झाला असून ॲड. कार्लुस फेरेरा हे त्यांची बाजू मांडत आहेत.

Sunburn Festival
Goa Corona Update: सतर्क व्हा ! ‘जेएन.1’चे देशात 21 रुग्ण तर राज्यात 19 बाधित

कृती आराखडा बनविण्यासाठी संयुक्त बैठक

सनबर्न महोत्सवाच्या देखरेखीसंदर्भातील कृतिआराखडा उद्या गुरुवारी न्यायालयात सादर करण्याच्या अनुषंगाने, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची संयुक्त बैठक आज बुधवारी सायंकाळी झाली.

येत्या २८ ते ३० डिसेंबर या कालवाधीदरम्यान वागातोर येथे सनबर्न हा ईडीएम महोत्सव होत आहे. राज्य सरकारला सनबर्न इव्हेंटवर लक्ष ठेवण्यासाठी कृती आराखडा सादर करण्यात सांगितले आहे.

त्यानुसार, बुधवारी सायंकाळी उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी. यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय संकुलात संयुक्त बैठक झाली. या बैठकीला आयोजक हरिंदर सिंग, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक जीवबा दळवी, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर ही टीम हणजूणला रवाना झाली.

तेथे सनबर्न स्थळाच्या आजूबाजूच्या विविध ठिकाणांना भेटी दिल्या तसेच आवाजाची पातळी व त्याचा स्थानिकांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी संगीत न वाजवता वर्तमान ध्वनी डेसिबल तपासले.

कासव संवर्धनालाही अडथळा नको

दरम्यान, नववर्ष स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात येतात. परंतु कासव संवर्धन क्षेत्रातील काही शॅक व रेस्टॉरंट्समध्ये कर्कश आवाजाने म्युझिक वाजवले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांवर होतो.

म्युझिक वाजवण्यास बंदी असलेल्या कासव संवर्धन किनारपट्टी परिसरातही देखरेख ठेवण्याची गरज असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाला यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने यावेळी केल्या. याचिकादार डेस्मंड आल्वारिस यालाही त्याच्या सूचना मांडण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com