Pernem News Update: १५ नोव्हेंबर २०२४ रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असून या निमित्त पत्रादेवी येथील नवीन हुतात्मा स्मारकाकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे
Birsa Munda JayantiDainik Gomantak

Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन; पेडण्यातून होणार शुभारंभ

Directorate of Tribal Welfare Goa : १५ नोव्हेंबर २०२४ रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असून या निमित्त पत्रादेवी येथील नवीन हुतात्मा स्मारकाकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे
Published on

पेडणे: आदिवासी कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्या वतीने यंदा गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात थोर स्वातंत्र्य सेनानी तसेच आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या दृष्टीने सरकारने पाऊलं उचलली आहेत.

शुक्रवारी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असून या निमित्त पत्रादेवी येथील नवीन हुतात्मा स्मारकाकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल. सकाळी १० वाजताच्या सुमारास सुरु होणाऱ्या या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण गोव्यातून लाखो लोकं जोडली जाण्याची शक्यता आहे. अनेक लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं या दृष्टीने सर्व तयारी सुरू आहे.

पेडण्यातून रॅली सुरु होणं ही पेडणे वासियांसाठी अत्यंत आनंदाची बाब ठरली असून दोन्ही मतदारसंघ अगदी जोमाने कामाला लागेल आहेत.

Pernem News Update: १५ नोव्हेंबर २०२४ रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असून या निमित्त पत्रादेवी येथील नवीन हुतात्मा स्मारकाकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे
Language Policy Directive: 'मराठी-कोकणी'तून अर्जाला उत्तर द्या! राजभाषा संचालनालयातर्फे निर्देश

पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे हे देखील या रॅलीचे आयोजन करण्याची तयारी करत आहेत.

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या रॅलीत पेडणे तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यामुळे बिरसा मुंडा यांचे कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवायला मदत मिळेल असे आवाहन सरपंच तुळशीदास गवस यांनी केले. दरम्यान महिलांसाठी देखील वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात महिलांनी यात सहभागी व्हावे अशी विनंती देखील पत्रकार परिषदेतून करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com