Tambdisurla News : साकोर्डा पंचायतीची बदनामी करू नका

महादेव शेटकर : गाडेधारकांना इशारा
Mahadev Shetkar
Mahadev ShetkarDainik Gomantak
Published on
Updated on

तांबडीसुर्ला : साकोर्डा ग्रामपंचायत गेल्या नऊ महिन्यांपासून चांगले काम करत आहे. मात्र, तांबडीसुर्ला येथील गाडेधारक पंचायतीची विनाकारण बदनामी करत असल्याच्या वर्तमानपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवर बातम्या व्हायरल झाल्या आहेत. यापुढे पंचायत मंडळ खोटे आरोप सहन करणार नसल्याचा इशारा पंच महादेव शेटकर यांनी आज (ता.6) सकाळी पंचायत सभागृहात आयोजित गाडेधारकांच्या विशेष बैठकीत दिला.

सरपंच प्रिया खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली गाडेधारकांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. त्यावेळी महादेव शेटकर सडेतोड बोलत होते. पंच संजना नार्वेकर, सचिव भूषण तावडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

Mahadev Shetkar
Goa Tourism: गोव्याला येण्यापूर्वी ऑनलाईन माहिती पाहतायं? मग ही बातमी वाचाच; नाहीतर...

गाडेधारकांना व्यापार परवाना देताना पंचायत मंडळाने कोणावरही अन्याय केला नव्हता. सर्व गाडेधारकांनी आपापसांत मिळूनमिसळून व परिसर स्वच्छ ठेवून आपला व्यवसाय करावा, अशी मंडळाची मागणी होती, असे शेटकर म्हणाले.

Mahadev Shetkar
Tambdi Surla Mahadev Temple: नुकसान करताहेत माकडं मात्र भुर्दंड सोसताहेत गाडेधारक... नेमका काय प्रकार?

इको-टुरिझमचे ४-५ प्रकल्प येत्या दहा वर्षांत पंचायत क्षेत्रात येणार आहे, त्यामुळे येथील परिसराचा विकास झपाट्याने होणार आहे. त्या प्रकल्पाचा फायदा प्रामुख्याने तांबडीसुर्ला येथील गाडेधारकांना होऊ शकतो. तेव्हा गाडेधारकांना पंचायतीकडे सौजन्याने वागले पाहिजे. गाडेधारकांनी परिसरात स्वच्छता राखण्याची गरज आहे. आपापसांतील वाद-विवाद विसरून व्यवसाय करावा.

- भूषण तावडे, सचिव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Panchayat Auto Approval
Monsoon Tourism
Honda Panchayat
Goa Wild Bison
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com