Vasco Fisherman vs Murmugao Municipal Coucil: अनेकदा विनंत्या करूनही मुरगाव पालिका घाऊक विक्रेत्यांना मासळी विक्री करण्यापासून न रोखल्याने आज मासळी मार्केटमधील किरकोळ विक्रेत्यांनी सकाळी पालिकेबाहेर मासळी विक्री करून आंदोलन केले.
घाऊक विक्रेत्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत विक्रेते पालिकेबाहेर मासळी विक्री करण्याचे बंद करणार नाहीत, असा इशारा दिला.
मात्र, नंतर वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी मासळी विक्रेत्यांची समजूत काढून घाऊक विक्रेत्यांवर कारवाईची ग्वाही दिल्यानंतर मासळी विक्रेत्यांनी तेथून जागा सोडली.
जोपर्यंत घाऊक मासळी विक्रेत्यांचा व्यवसाय बंद पाडत नाही, तोपर्यंत आम्ही नवीन मासळी मार्केट बांधकामास सहकार्य करणार नसल्याचे सांगून मासळी विक्रेत्यांनी नवीन मार्केटमधून जागा सोडली नाही.
मात्र, नंतर आमदार दाजी साळकर यांनी संबंधित अधिकारी व पोलिस यांच्याशी बैठक घेऊन घाऊक मासळी विक्रेत्यांचा व्यवसाय बंद पाडला. तद्नंतर मासळी विक्रेत्यांनी मासळी मार्केट सोडले व त्यांनी तात्पुरत्या शेडमध्ये आपली जागा घेतली.
घाऊक विक्रेत्यांमुळे आमचा व्यवसाय ठप्प
- मासळी मार्केटमधील किरकोळ मासळी विक्रेते आणि घाऊक मासळी विक्रेते यांच्यात गेली दहा वर्षे घमासान सुरू आहे.
- घाऊक मासळी विक्रेत्यांमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असून आम्हाला गिऱ्हाईक पाठ फिरवतात, असे मासळी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
- घाऊक विक्रेत्यांना मासळी विक्री करण्यापासून बंद करा, अशी मागणी महिला मासळी विक्रेत्यांची गेल्या दहा वर्षापासून आहे. त्यासाठी मासळी विक्रेत्या महिलांनी पालिकेसमोर अनेक आंदोलने केली.
तोडग्याबाबत पालिका अपयशी
मासे विक्रेत्यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना घेराव घालून जाब विचारला. पण, आश्वासनाशिवाय पालिका काही एक करू शकली नाही. घाऊक विक्रेत्यांना ते मासळी विक्री करण्यापासून रोखू शकले नाही.
मध्यंतरी माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी या विक्रेत्यांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही यश आले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.