डॉन बॉस्को कृषी महाविद्यालयाला मान्यता नाही

अभाविपचा आरोप : डॉन बॉस्कोतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
Farm
FarmDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: सुळकर्णे - सांगे येथील डॉन बॉस्को कृषी महाविद्यालयाला भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अंतर्गत मान्यता नसल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या व पदवी पूर्ण करून गेलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. 2015 पासून विद्यार्थ्यांना खोट्या आशेवर ठेवून हे कृषी विद्यालय येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अवधूत खुंटकर यांनी केला आहे.

(Don Bosco Agricultural College is not recognized)

Farm
गुणवत्तेसाठी शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढवणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने व या कृषी विद्यालयाने त्वरित तोडगा काढावा, अन्यथा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे.

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बाब समोर आणली आहे. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. 2015 पासून सुळकर्णे येथे डॉन बॉस्को कृषी महाविद्यालय सुरू आहे. हे विद्यालय गोवा विद्यापीठाशी संलग्न आहे, पण या कृषी महाविद्यालयाला भारतीय कृषी संशोधन परिषदेची मान्यता नसल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदवीला कोणताच अर्थ राहत नसल्याने विद्यार्थी पेचात सापडले आहेत.

आयसीएआर ही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत संपूर्ण देशात कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचे समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे.

ही संस्था गेल्या सात वर्षांत मान्यता मिळविण्यात असमर्थ ठरली असून फक्त विद्यार्थ्यांना खोटी आश्वासने देण्याचे काम या विद्यालायाने केले आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com