गुणवत्तेसाठी शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढवणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये घसरलेला शैक्षणिक दर्जा, उच्च शिक्षण संस्थांमध्ये कौशल्ययुक्त गुणात्मक शिक्षणाची वाढ घडवून आणण्यासाठी राज्य सरकार आणि उच्च शिक्षण खात्याच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज मुख्यमंत्री डॉ. प्रमुख सावंत यांनी राज्यातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील प्रतिनिधींशी बैठक घेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

(To raise the standard of educational institutions for quality in goa)

Goa CM Pramod Sawant
निवडणुकीसाठी ओबीसींना आरक्षण द्यावेच लागेल

या बैठकीला मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, शिक्षण सचिव, गोवा विद्यापीठ, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बिट्स पिलानी, आयआयटी, एनआयटी या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, प्रामुख्याने उच्च शिक्षणामध्ये मोठ्या बदलाची अपेक्षा असून या संस्थांमध्ये कृषी, माहिती तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, नवशिक्षण, तंत्रज्ञान, शाश्वत विकास, व्यवसाय जीवन विज्ञान, आर्थिक व्यवहार, एमजीटी आदी क्षेत्रांशी संबंधित अत्याधुनिक शिक्षणाच्या समावेशाची गरज आहे. असे झाल्यास त्याचा फायदा राज्याबरोबर देशालाही होईल. यासंदर्भाचा सविस्तर अहवाल येत्या महिन्याभरात तयार केला जाईल आणि तो अंमलबजावणीसाठी संबंधित संस्थांकडे पाठवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com