NCB ’चा दबदबा, स्थानिक पोलिसांना अपयश का?

हणजूण येथील ड्रग्‍स कारवाई : अनेकांना पडलेला प्रश्‍‍न, अप्रत्‍यक्षरीत्‍या व्‍यावसायिकांना वरदहस्‍त?
Anjuna Drug Case
Anjuna Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) हणजूण येथे कारवाई करीत ड्रग्सनिर्मिती करणाऱ्या एका प्रयोगशाळेचा भांडाफोड केला. मात्र, या कारवाईनंतर स्थानिक पोलिस यंत्रणेच्या क्रियाशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांची माहिती स्थानिक पोलिस व वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना असते. त्यांनी मनात आणले तर ते निश्चितच प्रतिबंध घालू शकतात. पण, त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते, असे एकंदर स्थिती पाहून स्थानिक बोलू लागले आहेत.

गोवा पोलिस मजबूत आहेत आणि अनेक मोठ्या कामगिरी आजवर त्यांनी केल्या आहेत. मात्र, ज्यावेळी केंद्रीय एजन्सी राज्यात येऊन सलग कारवाई करते, त्यावेळी स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.

Anjuna Drug Case
Ponda - Curti: कुर्टी-फोंडा येथे जलवाहिनी फुटली; फोंडा, मडकईसह अनेक ठिकाणच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम

उत्तरेत विशेषतः किनारी भागांत पोलिसांकडून अमलीपदार्थ विक्रीसंदर्भात बारीकसारीक कारवाया अधूनमधून सुरूच असतात. परंतु विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्यात पोलिसांना अद्याप तितकेसे यश प्राप्त झालेले दिसत नाही.

अशातच मध्यंतरी हैदराबाद पोलिस व गोवा पोलिसांमध्ये याच विषयावरून आरोप-प्रत्यारोप सुद्धा झाले होते.

Anjuna Drug Case
Sonali Phogat Murder Case: संशयित सुखविंदर सिंगला 7 महिन्‍यांनी सशर्त जामीन

1. पोलिसांची ‘एलआयबी’ टीम व बीट पोलिसांकडे अमलीपदार्थ प्रयोगशाळेविषयी माहिती नव्हती की जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले होते, यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.

2. मुळात स्थानिक तपास यंत्रणेचे माहिती देणारे दुवे बाहेरील तपास यंत्रणेपेक्षा अधिक व तत्‍पर असण्याची गरज असते. परंतु अशा कारवाया एकंदरीत स्‍थानिक पोलिसांच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

3. पोलिस यंत्रणा वेळोवेळी भाडेकरू पडताळणी अर्ज भरण्याचे आवाहन करते. मात्र, अनेकजण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना सुद्धा तपासावेळी आडकाठी येते.

4. घरमालकांनी भाडेकरू अर्ज भरून दिल्यास पोलिसांना देखील कुठे कोण राहतो किंवा त्या व्यक्तीविषयी माहिती उपलब्ध होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com