Sonali Phogat Murder Case: संशयित सुखविंदर सिंगला 7 महिन्‍यांनी सशर्त जामीन

सोनाली फोगाट मृत्‍यू प्रकरण : अमली पदार्थांचा वापर
Sonali Phogat Case | Sonali Phogat Murder Case | CBI Inquiry
Sonali Phogat Case | Sonali Phogat Murder Case | CBI Inquiry Dainik Gomantak

Sonali Phogat Murder Case भाजप नेत्या व प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली फोगाट हिच्या मृत्यूप्रकरणातील संशयित सुखविंदर सिंग याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला.

संशयिताने न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, पासपोर्ट न्यायालयात जमा करावा अन्यथा नसल्यास त्यासंदर्भातचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करावे तसेच आठवड्यातून दर शुक्रवारी ‘सीबीआय’ कार्यालयात उपस्थिती लावावी, अशी अट जामीन देताना घालण्यात आली आहे. सुखविंदरला सात महिन्‍यांपूर्वी अटक झाली होती.

‘सीबीआय’ने सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी तपास करून संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग या दोघांविरुद्ध खून व कटकारस्थानच्या आरोपाखाली आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

या खटल्यावरील सुनावणी अजून सुरू झालेली नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सुखविंदर सिंग याने सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

Sonali Phogat Case | Sonali Phogat Murder Case | CBI Inquiry
Digambar Kamat: मडगावाचा चेहरा मोहरा बदलणार, वर्षभरात मतदारसंघात 'एवढ्या' कोटींची विकासकामे

पुरावा नाही!

सुखविंदर सिंग याने खरेदी केलेल्या ड्रग्जचे सेवन केल्याने सोनाली फोगाट हिचा मृत्यू झाल्याचा दावा संशयिताचे ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी फेटाळून लावला.

सोनाली हिचा मृत्यू संशयित सुखविंदर सिंग याने खरेदी केलेल्या ड्रग्जमुळे झाल्याचा परिस्थितीजन्य पुरावा नाही.

सोनाली हिचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्यापासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा या मृत्यूशी काहीच संबंध नाही, त्यामुळे कोणत्याही अटी घालून जामीन द्यावा, असा युक्तिवाद देसाई यांनी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com