
Mahanand Naik documentary
पणजी: लग्नाचे आमिष दाखवून भोळ्याभाबड्या युवतींवर अत्याचार करून अखेर त्यांचा खून करणाऱ्या सिरियल किलर महानंद नाईकवर आता डॉक्युमेंटरी येत आहे. काही दिवसांपूर्वी महानंदवर आवदा व्हिएगस यांनी लिहलेले ‘अ सायलेंट इन्व्हेटरेट सिरीयल किलर’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून महानंद केलेल्या 16 खुनाचा मागोवा घेतला जाणार आहे.
महानंद नाईक याच्यावर आधारित ही डॉक्युमेंट्री येत्या 21 मार्च रोजी स्ट्रीम होणार आहे. पॅट्रीक ग्रॅहम यांनी या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शन केले आहे. महानंदने महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या लैंगिक अत्याचार करायचा आणि विश्वासात घेऊन निर्जनस्थळी त्यांचा दुपट्ट्याने गळा आवळून खून करायचा. तसेच, तो महिलांच्या अंगावरुन दागिने लुटून पोबारा करायचा. 1994 ते 2009 असे 15 वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत दुष्कर्म करत राहिला.
महानंद नाईकची संपूर्ण गोव्यात दहशत निर्माण झाली होती आणि पोलिसांपुढे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. 11 सप्टेंबर 1995 रोजी बेतोडा येथे निर्जनस्थळी महानंदने एका महिलेचा खून करून दागिने पळविले असा आरोप त्याच्यावर होता. या खुनाची कबुली महानंद नाईकने तब्बल 14 वर्षानंतर 3 मे 2009 रोजी दिली. विशेष म्हणजे याच प्रकरणात 1995 मध्ये त्याला अटक झाली होती. मात्र, पुराव्या अभावी त्याला सोडावं लागले होते.
माजी पोलिस उपअधीक्षक सी.एल. पाटील यांनी याप्रकरणाचा कसून तपास करुत महानंद नाईकला शिक्षा होण्यात महत्वाची भूमिका बजावली. अलिकडेच आवदा व्हिएगस यांच्या ‘अ सायलेंट इन्व्हेटरेट सिरीयल किलर’ या पुस्तकात देखील महानंदच्या कुकर्मांचा मागोवा घेण्यात आला आहे. दरम्यान, पॅट्रीक यांच्या डॉक्युमेंट्रीतून महानंदच्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती रुपेरी पडद्यावर पाहण्यास मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.