Olive Ridley Turtle: कासव संवर्धनात अडसर ठरल्यास कारवाई : विश्‍वजीत राणे

मोरजीत ध्वनिप्रदूषण; हॉटेल परवाना रद्दचा ‘एफडीए’चा विचार
Vishwajit Rane inaugurated free health checkup camp in Pernem
Vishwajit Rane inaugurated free health checkup camp in Pernem Dainik Gomantak
Published on
Updated on

Olive Ridley Turtle: ध्वनिप्रदूषण प्रकरणी कठोर कारवाईचा निश्‍चय सरकारने केला असून मोरजी येथील हॉटेलचा खाद्य परवाना रद्द करण्याचा ‘एफडीए’कडून विचार सुरू आहे. दरम्यान, कासव संवर्धन प्रकल्पाला अडथळा ठरत असल्यास संबंधितांवर खात्याकडून कायदेशीर कारवाई करू, असे वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले. पेडणे येथे आरोग्य शिबिरात पत्रकारांशी ते बोलत होते.

राणे म्हणाले, आपण कुणाला उगाच त्रास देणार नाही. परंतु कासव संवर्धन मोहिमेला अडथळा आणणाऱ्यांवर वनमंत्री म्हणून वन खात्याच्या कायद्यानुसार कारवाई करू.

Vishwajit Rane inaugurated free health checkup camp in Pernem
Gomantak Swasthyam Prashanmanjusha 2023 : गोमन्‍तक स्वास्थ्यम प्रश्‍नमंजूषा’ उद्यापासून; लाखोंची बक्षिसे

उकीयो बीच रिसॉर्ट,असे या हॉटेलचे नाव असून मोठ्या आवाजात संगीत वाजवून रात्री उशिरापर्यंत चमकदार दिवे वापरल्याने कासव संवर्धन क्षेत्रात अडथळा निर्माण केल्याबद्दल ही कारवाई होणार आहे.

रिसॉर्टने समुद्रकिनाऱ्यावर एक लोखंडी रचना देखील वाढवल्याने कासव संवर्धन क्षेत्रावर परिणाम झाला होता. पेडणे तालुक्यातील मोरजी समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धन क्षेत्र असून येथे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर वन खात्याकडून कठोर कारवाई केली जाईल.

Vishwajit Rane inaugurated free health checkup camp in Pernem
आरोपी पकडले खरे पण माझे पैसे कोण देणार? गोव्यात लुबाडणूक झालेल्या 'त्या' जपानी पर्यटकाचा प्रश्न

खात्याला निदर्शनास आणून देण्यात आले आहे, की मोरजी येथे कासव संवर्धन क्षेत्रा जवळ अनेक पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. कासव संवर्धन क्षेत्रापासून 100 मीटर अंतरावर या पार्ट्या होतात.

दीड महिन्यात 2900 अंडी

मोरजी, आश्वे, हरमल या किनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटन हंगामात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी वाढत आहेत. तर दुसऱ्या बाजूने ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करतही यंदा दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल 35 सागरी कासवांनी मोरजी आणि आश्वे किनारी भागात येऊन 2900ची अंडी घातलेली आहेत आणि त्याला सुरक्षा देण्याचे काम वन्य विभाग करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com