फातोर्डा: गेल्या दहा वर्षात फातोर्डा मतदारसंघाची दुर्दैशा झाली असुन शेतकऱ्यांना आश्र्वासने देऊन आयटी हबच्या नावाखाली येथील शेतजमीनीचे रुपांतर करण्यात आले. निवडणुका जवळ आल्याने आता ह्याच लोकांनी शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या जातील अशी आमिषे दाखवायला सुरु केली आहे. पण शेतकऱ्यांनी अशा भूल थापांना बळी पडू नये. हे लोक सध्याच्या परिस्थिती काहीच करु शकणार नाहीत असे माजी आमदार व रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यानी सांगितले आहे.
फातोर्डातील शेतकऱ्यांसाठी सरकार तुमच्या दारी या उपक्रमाखाली कृषी कार्ड वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . याच मेळाव्याचे उदघाटन केल्यावर नाईक बोलत होते. कार्यक्रमाला नगरसेवक कामिल बार्रेटो, बबिता नाईक, सदानंद नाईक, जॉसेफ सिल्वा, ग्लेन डायस, कृषी खात्याचे अधिकारी महेश काणकोणकर, संजय फातर्पेकर आदी मंडळी उपस्थित होती.
शेत जमीन भारतीय जिवनाचा मोठा भाग आहे. भारत कृषी प्रधान देश आहे. पण यापुर्वी्च्या कॉंग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या विकासाएैवजी केवळ त्यांचे शोषण केले. पण केंद्रातील व गोवा राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगली पावले उचलली असुन त्यांच्यासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्याचा लाभ सर्वांनीच घ्यावा.
लोकप्रतिनिधीनी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असते. पण स्थानिक प्रतिनिधी काहीच करीत नसल्याचे नाईक याने सांगितले.
कृषी खात्यातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. पुर्वी या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रे सादर करावी लागत असे. पण 2014 पासून खात्याने सर्व शेतकऱ्यांची
पण 2014 पासून खात्याने सर्व शेतकऱ्यांची नोंदणी केली असुन त्याची संपुर्ण माहिती ठेवली आहे. नंतर सरकारने कृषी कार्ड योजना सुरु केली. कृषि कार्ड ही शेतकऱ्याची ओळख. या कार्डावरुन शेतकऱ्यांना सर्व सुविधा व योजना उपलब्ध केल्या जातात अशी माहिती सासष्टी झोनल कृषी विभागाचे सहाय्यक झोनल अधिकारी महेश काणकोणकर याने सांगितले. गोव्यात 35 हजार व सासश्टी-मुरगाव तालुका मिळुन 6300 शेतकरी कृषी कार्ड धारक असल्याची माहिती दिली. योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रियाही समजावुन सांगितली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.