Child Artist: निर्मात्यांनो सावधान!! बाल कलाकार पाहिजे असतील तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक

Child Artist Shooting in Goa: बाल कलाकारांना सामावून घ्यायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक
Child Artist Shooting in Goa: बाल कलाकारांना सामावून घ्यायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक
Child Artist Film Shooting Dainik Gomantak
Published on
Updated on

Child Artist Shooting In Goa

पणजी: लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी गोवा सरकारने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारच्या या निर्णयानुसार आता निर्माते आणि निर्मात्या कंपन्यांना त्यांच्या कामात बाल कलाकारांना सामावून घ्यायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे.

गोवा बालकामगार नियमांमध्ये केलेल्या बदलानुसार चित्रपट, जाहिरात, मालिका किंवा इतर कोणत्याही निर्मितीमध्ये बाल कलाकारांची गरज असल्यास त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. एवढंच नाही तर बाल कलाकार सेट्सवर असताना त्यांची जबाबदारी घेणाऱ्या माणसाची संपूर्ण माहिती देणं गरजेचं आहे.

बाल कामगारांचे शोषण रोखण्यासाठी बाल कामगार विभागाने जून महिन्यातच नियमांमध्ये बदल केले होते आणि यांबद्दल स्थानिकांची प्रतिक्रिया मागवली होती. नवीन नियमांनुसार बाल कलाकारांसाठी जास्तीत जास्त पाच तास कामाची आखणी करता येणार आहे, शिवाय तीन तासांनंतर यांना ब्रेक देणं अनिवार्य करण्यात आलंय.

शूटिंगच्या कामामुळे बाल कलाकारांची शाळा बुडणार नाही किंवा शालेय शिक्षणात कोणताही व्यत्यय येणार नाही याची खबरदारी निर्मात्या कंपन्यांनी घेतली पाहिजे. बाल कलाकार स्टेट्सवर वावरत असताना किमान एक माणूस पाच कलाकारांच्या देखरेखीसाठी नेमला गेला पाहिजे असा निर्णय जारी करण्यात आलाय.

Child Artist Shooting in Goa: बाल कलाकारांना सामावून घ्यायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक
St. Xavier's Exposition: 'या' सरकारकडे इच्छाशक्तीच नाही! 'पोप फ्रान्सिस' मुद्द्यावरून विरियातोंनी सुनावले खडे बोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com