‘गोमन्तक’च्या यशात वितरकांचा वाटा

राजू नायक: ‘अमर लता’ या सांगीतिक कार्यक्रमात सन्मान
Dainik Gomantak
Dainik Gomantak Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मागच्या 60 वर्षांत दै. ‘गोमन्तक’ने फक्त बातम्याच देण्याचे काम केले नाही, तर गोव्यातील कानाकोपऱ्यात जाऊन लोकांच्या व्यथा ऐकून त्यांना वाचा फोडण्याचे काम केले. त्यामुळेच ‘गोमन्तक’ हे सदैव लोकांची नाडी पकडून काम करणारे राज्यातील एकमेव दैनिक ठरले, असे प्रतिपादन दै. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले.

‘अमर लता’ या सांगीतिक कार्यक्रमावेळी दै. ‘गोमन्तक’च्या दक्षिण गोव्यातील वितरकांचा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात विष्णू वस्त, दिलीप वस्त, संजय कोमरपंत, भवरसिंह जोधा, शहनाझ इस्माईल नदाफ यांचा समावेश होता.

Dainik Gomantak
'गोव्यातील भूखंडांच्या विकासाचे जिल्हा पंचायतींना अधिकार'

यावेळी मंत्री काब्राल यांनी गोव्याच्या उत्कर्षात ‘गोमन्तक’चा वाटा मोलाचा असल्याचे मत व्यक्त करून ‘गोमन्तक’ने आपल्या वाटचालीचे शतक पूर्ण करावे अशी मनीषा व्यक्त केली.

कुडचडेचे नगराध्यक्ष विश्वास सावंत, ज्येष्ठ हार्मोनियमवादक शिवराय फोंडेकर, ‘गोमन्तक’चे मुख्य व्यवस्थापक सचिन पोवार, वितरण व्यस्थापक अनिल शेलार व ब्युरो प्रमुख सुशांत कुंकळ्येकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mining Transport
Goa Government Development Exhibition
Konkan Railway Modernization Plan
 Goa AAP Protest Against Power Bills
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com