'गोव्यातील भूखंडांच्या विकासाचे जिल्हा पंचायतींना अधिकार'

पंचायतमंत्री गुदिन्हो यांची ग्वाही; असंघटित कामगारांना ई-श्रम कार्डांचे वितरण
Mavin Gudhino
Mavin GudhinoDainik Gomantak

वास्को: गावे विकसित करण्यात जिल्हा पंचायत सदस्यांची प्रमुख भूमिका आहे. लवकरच राज्यभरातील खुले भूखंड विकसित करण्यासाठी जिल्हा पंचायतींना अधिकार देण्यात देतील, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात व इतरांच्या उपस्थितीत दाबोळी मतदारसंघातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्ड वाटपप्रसंगी गुदिन्हो पत्रकारांशी बोलत होते. गोव्यासारख्या छोट्या राज्यातही विकासकामे करण्यात जिल्हा पंचायतींची महत्त्वाची भूमिका आहे. गोव्यात विशेषत: सांकवाळ येथे जिल्हा पंचायत मंडळ उत्कृष्ट काम करत आहे, ज्याचे प्रतिनिधित्व अनिता थोरात यांनी केले आहे, असेही ते म्हणाले.

Mavin Gudhino
'गोव्यात सॉफ्टवेअर टुरिझमला आहे वाव'

गोदिन्हो पुढे म्हणाले की, असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकारी योजना आणि फायदे मिळण्यासाठी ई-श्रम कार्ड महत्त्वाचे आहे. ‘ई-श्रम कार्डां’द्वारे कामगार विम्यासारख्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात म्हणाल्या, की केंद्र सरकारच्या योजना राज्यातील असंघटित कामगारांना मिळवून देण्याची जबाबदारी जिल्हा पंचायत सदस्यांवर सोपविण्यात आली आहे.

ज्या कामगारांच्या कोणत्याही संघटना नाहीत किंवा कोणीही त्यांची जबाबदारी घेऊ इच्छित नाही त्यांच्यासाठी ई-श्रम कार्ड जारी करण्याचा हा सरकारी उपक्रम खूप फायदेशीर ठरेल.

Mavin Gudhino
गोव्यात झाले कोरोनाचे नवे 10 रुग्ण....

‘प्रत्येक पंचायतीने सौर ऊर्जेची निर्मिती करावी’

वीज दरवाढीवर उपाय म्हणून लोक आणि संस्थांना सौर ऊर्जेकडे वाटचाल करण्याचा सल्ला देत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी राज्यातील प्रत्येक पंचायत घर सौर ऊर्जेवर चालावे, जेणेकरून ग्रामस्थांना सौर ऊर्जेचे फायदे पाहता येतील, असे सांगितले. नवे वाडे येथील श्री राष्ट्रोळी संतोषी माता मंदिराच्या मंदिर समितीला सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांसाठीचा धनादेश यावेळी देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com