Goa Update: अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते पदके प्रदान

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

गोवा: स्वांतत्र्यदिनानिमित्त गोव्यातील पोलिस व अग्निशमन दलाच्या प्रत्येकी एक तसेच गृहरक्षक व नागरी संरक्षण विभागातील दोन मिळून एकूण चार अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट सेवेसाठी पदके काल जाहीर करण्यात आली होती. आज त्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

(Distributed the Certificate of Honors to the Freedom Fighters, Families of Freedom Fighters)

CM Pramod Sawant
75th Independence Day: गोव्यातील 'Francis of Assisi' चर्चवर तिरंगी रोषणाई

पोलीस, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, होमगार्ड, शिक्षण, महसूल विभागातील अधिकाऱ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. गोवा सरकार, जनतेच्या पाठिंब्याने, पंतप्रधान श्रींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा यासाठी कटिबद्ध आहे.

गेली दोन वर्षे स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी सर्वोत्कृष्ट सेवेसाठी जाहीर झालेल्या पोलिस, अग्निशमन दल व गृहरक्षक व नागरी सरंक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना आज, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सेवा पदकाने सन्मानित केले आहे.

यांचा झाला सन्मान

गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीमध्ये कोलवा वाहतूक पोलिस निरीक्षक विजननाथ कवळेकर यांना पोलिस सेवा पदक, अग्निशमन दलाचे उपअधिकारी प्रशांत धारगळकर यांना अग्निशमन सेवा पदक तर नारायण पागी यांना गृहरक्षक व नागरी संरक्षण सेवा पदक देण्यात आले आहेत. तर सेकंड इन कमांडंट कॅरोलिना फर्नांडिस यांचाही या यादीत समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com