गोव्यात पहिले Online CNG स्टेशन सुरू

सीएनजी, पेट्रोल, डिझेल, तसेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असलेले हे पश्चिम विभागातील एकमेव केंद्र आहे.
Online CNG
Online CNGDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोव्यातील (Goa) पहिल्या ऑनलाईन सीएनजी (Online CNG) स्टेशनचे उदघाटन वीजमंत्री नीलेश काब्राल (Power Minister Nilesh Cabral) यांच्या हस्ते गुरुवारी झाले. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (HPCL) मेसर्स कवळेकर फ्युअल स्टेशन येथे केंद्र कार्यान्वित आहे. सीएनजी, पेट्रोल, डिझेल, तसेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असलेले हे पश्चिम विभागातील एकमेव केंद्र आहे.

या उदघाटन कार्यक्रमास एचपीसीएलचे वास्को विभाग उपसरव्यवस्थापक फाल्गुनी हल्दर, किरकोळ विक्रेते सिद्धेश कवळेकर, अदानी गॅसचे प्रमुख भाषित ढोलकिया यांची उपस्थिती होती. यावेळी सीएनजी स्टेशनबरोबरच याच केंद्रावर 15 केव्हीए सौर पद्धतीचेही याठिकाणी उदघाटन करण्यात आले. हा एचपीसीएल आणि गोवा सरकारचा हरित, अपारंपरिक उर्जा वापराचा उपक्रम आहे.

Online CNG
Goa वीज खात्याचा अजब-गजब कारभार

वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी एचपीसीएल, आयओएजीपीएल आणि विक्रेते सिद्धेश कवळेकर यांचे यावेळी अभिनंदन केले. स्वच्छ आणि हरित इंधन ग्राहकांना पुरविण्यासाठी एचपीसीएल नेहमीच पुढाकार घेते आणि आपल्या सरकारचा पुढील 15 वर्षांत पेट्रोल आणि डिझेल वाहने बंद करण्याचा आणि स्वच्छ इंधन पुरविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

एचपीसीएल पर्यावरणपूरक हरित उपक्रमांसह चांगले इंधन वचनासाठी कटिबद्ध असून त्यांच्या रिटेल आऊटलेटवर ग्राहक सेवेच्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवेसाठी वचनबद्ध असल्याचे फाल्गुनी हल्दर यांनी सांगितले. जीएएलच्या दाभोळ-बंगळूर नैसर्गिक वायू पाईपलाईनवर झुआरी येथे नळजोडणीद्वारे सीएनजी स्टेशनला पुरवठा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Online CNG
Goa Government: म्हणून 120 कोटींचे अनुदान वीज खात्याला द्यावे लागले

14 सीएनजी स्टेशन

अदानी गॅसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) भाषित ढोलकिया यांनी सांगितले, की आयओएजीपीएल औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती युनिट्सना पीएनजी पुरविण्यासाठी सुमारे 55 किलोमीटर स्टील नेटवर्क, 500 किलोमीटरहून अधिक एमडीपीई नेटवर्कसह संबद्ध सुविधांसह पाईपलाईन नेटवर्क स्थापित करेल. आयओएजीपीएल दक्षिण गोव्यातील सीजीडी प्रकल्पांसाठी 300 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करून वाहतूक क्षेत्राची पूर्तता करण्यासाठी 14 सीएनजी स्टेशन उभारेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com