तुयेत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ

बांधकाम बंद ठेवण्याचा आदेश, तरीही कोळंबी पैदास केंद्रात मातीचा भराव
Home Construction |
Home Construction |Dainik Gomantak
Published on
Updated on

सोणये-तुये येथे शेतजमिनीत अतिक्रमण करून कोळंबी पैदास केंद्र केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असून यासंदर्भात खटला सुरू आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम करू नये, असा आदेश पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला असतानाही येथे सध्या ट्रकद्वारे मातीचा भराव टाकल्याची तक्रार येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Home Construction |
Babush Monserrate : आता स्थानिक तरी कसे ओळखणार?

सोणये-तुये येथे कुळांच्या या जमिनीत काही वर्षांपूर्वी कोस्टल ॲक्वाकल्चर ऑथॉरिटीने कोळंबीचे उत्पन्न घेण्यास परवानगी दिली होती. गोवा फाऊंडेशन संस्था आणि तुये येथील जुझे लोबो यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर ऑथॉरिटीने कोळंबी उत्पादनाचा परवाना रद्द केला होता.

सध्या हा प्रकल्प बंद असला तरी या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. तसेच मातीचा भराव घालणे व पारंपरिक वाट अडविण्याचे प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Home Construction |
Gomantak Special Report : गोव्यात वेश्‍या आणि ड्रग्ज व्यवसायामध्ये ‘बॉबी’ची दहशत; गुन्हेगारीला बळ

प्रकरण न्यायप्रविष्ट

हे प्रकरण पेडणे उपजिल्हा कार्यालयात न्यायप्रविष्ट असतानाच कोळंब पैदास प्रकल्पात बेकायदा मातीचा भराव टाकण्याचे काम जोरात सुरू असल्याची तक्रार विठोबा राऊळ, शिरीष नाईक, सुशांत नाईक, आनंद खोर्जुवेकर, प्रताप आराबेकर, सुहास नाईक, सुधीर नाईक, कृपेश नाईक यांनी केली आहे.

नदीचे उपप्रवाह बुजवले

पारंपरिक पायवाट आणि शेतीचा मळा यांच्यामध्ये नदीचे उपप्रवाह आहेत. या नदीच्या उपप्रवाहांवर कोळंबी पैदास व्यावसायिकांनी अतिक्रमण करून ते बुजवून नदीच्या उपप्रवाहांचे अस्तित्वच संपवले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com