Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak

Babush Monserrate : आता स्थानिक तरी कसे ओळखणार?

जेटी प्रवेश शुल्कावरून मोन्सेरात यांचा सवाल
Published on

Babush Monserrate : दोना पावला जेटीवर पर्यटकांना शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्क आकारणीतून स्थानिकांना वगळण्यात येणार असले तरी ते ओळखणार कसे? असा सवाल महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केला आहे.

दोना पावला जेटीच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आपल्याला होते. परंतु आपण आजारी असल्याने गेलो नाही. जेटी पर्यटकांना खुली झाली ही चांगली बाब आहे. परंतु स्थानिक नागरिकांना ज्या पद्धतीने शुल्क आकारले जाणार नाही, असे म्हटले आहे ते आपणास अद्याप समजले नाही.

कारण स्थानिकाबरोबर कोणी आल्यास प्रत्येकाची ओळख पटवणार काय? हजारो पर्यटकांबरोबर शेकडो नागरिकही त्याठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाची ओळख पटविणे शक्य आहे का? असा सवालही त्यांनी गोमत्नकशी बोलताना व्यक्त केला.

Babush Monserrate
Gomantak Special Report : गोव्यात वेश्‍या आणि ड्रग्ज व्यवसायामध्ये ‘बॉबी’ची दहशत; गुन्हेगारीला बळ

व्यावसायिकांची चिंता काहीशी दूर

दोना पावला जेटी डिसेंबरमध्ये खुली करण्याची तयारी पर्यटन खात्याने केली होती. अखेर पर्यटन मंत्री रोहन खंवटेच्या वाढदिवसाचे औचित्य साधले गेले आणि ती जेटी पर्यटकांसाठी खुली झाली.

दरम्यानच्या काळात दोना पावला जेटीपरिसरात विविध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मात्र वेगवेगळी चर्चा सुरू होती. जेटी खुली होत नसल्यामुळे तेथील व्यवसायिकांनी मोन्सेरात यांच्याकडे वारंवार विचारणा केली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com