फोंडा : डिजिटल ऑनलाईन (Digital Online) व्यवहार करताना ग्राहकांनी सतर्कता बाळगावी, आमिषाला भुलून स्वतः चे नुकसान करुन घेऊ नका, असे आवाहन प्रमुख पाहुणे अरुणकुमार पिल्लई (Arun Kumar Pillai) यांनी प्रतिपादन केले.
बुधवार 27 रोजी फोंड्यात ग्राहकदिन कार्यक्रमावेळी तिस्क फोंडा येथील नागरी पुरवठा खात्याच्या सभागृहात काढले.
व्यासपीठावर दिलीप गावडे, प्रकाश नाईक, शब्बिर शेख, जयेश नाईक, उपस्थित होते. यावेळी फेअर डिजिटल फायनान्स (Digital Finance) या विषयावर नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सध्याच्या काळात डिजिटल व्यवहारात काही वेळेला फसवणूक होते. अशा फसवणुकीपासून बचावासाठी, सुरक्षित व्यवहारासाठी दक्ष राहाणे गरजेचे आहे,असेही पिल्लई यांनी सांगितले. स्वस्त धान्य दुकान वितरक, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार दिपक नाईक यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.