Goa-Bhopal Flight: 1 डिसेंबरपासून गोवा-भोपाळदरम्‍यान थेट विमानसेवा, पर्यटनाला मिळणार चालना!

Goa-Bhopal Direct Flight Launch: ‘इंडिगो’ या भारतातील आघाडीच्या वाहतूक कंपनीतर्फे १ डिसेंबरपासून गोवा ते भोपाळ यादरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.
Goa-Bhopal Flight: 1 डिसेंबरपासून गोवा-भोपाळदरम्‍यान थेट विमानसेवा, पर्यटनाला मिळणार चालना!
Goa-Bhopal FlightDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘इंडिगो’ या भारतातील आघाडीच्या वाहतूक कंपनीतर्फे १ डिसेंबरपासून गोवा ते भोपाळ यादरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. आठवड्यातून सहा फेऱ्या सुरू करण्यात येतील.

‘इंडिगो’च्या ग्लोबल सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा यांनी सांगितले की, गोव्याबरोबर भारतातील आणखी एक शहर आमच्या नेटवर्कमध्ये जोडतांना आंम्हाला आनंद होत आहे. गोवा आणि भोपाळदरम्यान थेट विशेष सेवा सुरू केल्यामुळे आता गोव्यातून भारतातील २२ शहरांसाठी आठवड्याला सरासरी ४०० फेऱ्या होतील. या नवीन मार्गामुळे या महत्त्वपूर्ण भागातील सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यटनाला चालना मिळेल. भारतातील एक आघाडीचे प्रवासी वाहतूक सेवा कंपनी म्‍हणून आम्ही नेहमीच आमच्या प्रवाशांना परवडणारी, वेळेत, नम्र आणि तणावमुक्त सेवा देण्यास वचनबद्ध आहोत.

आकर्षक समुद्रकिनारे, उत्तम नाईट-लाईफ आणि पोर्तुगीज परंपरेसाठी प्रसिद्ध अशा गोव्यात सूर्यप्रकाश, वाळू आणि संस्कृती यांचे मिश्रण आहे. पर्यटक नेहमीच ओल्ड गोव्यातील ऐतिहासिक चर्चेस, वॉटर-स्पोर्टस्‌ किंवा आकर्षक किनाऱ्यांसह आनंद घेण्यासाठी येथे नेहमीच भेट देत असतात. तर, ‘तलावांचे शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोपाळमध्ये शाही थाट आणि नैसर्गिक सुंदरता भरलेली आहे.

Goa-Bhopal Flight: 1 डिसेंबरपासून गोवा-भोपाळदरम्‍यान थेट विमानसेवा, पर्यटनाला मिळणार चालना!
Goa-Bhopal Flight: एअर शोमुळे गोवा-भोपाळ फ्लाईटच्या वेळेत बदल; 1 ऑक्टोबरपर्यंत व्यवस्था

दरम्‍यान, वेबसाईट https://www.goIndiGo.in वरून किंवा ॲपवरुन या विमानांचे बुकिंग प्रवासी करू शकतील. या नवीन फेऱ्यगंमुळे एअरलाईनच्या स्थानिक जोडणीला चालना मिळू शकेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com