Building Collapse
Building CollapseDainik Gomantak

Building Collapse: चिंचणीत जीर्णावस्थेत असलेली पोर्तुगीजकालीन इमारत कोसळली

अशा सर्व इमारती परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात
Published on

Portuguese-era building collapsed in Chinchinim

राज्यात अशा अनेक इमारती आहेत ज्या पोर्तुगीजकालीन असून सध्या जीर्णावस्थेत आहेत. अशा सर्व इमारती परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. चिंचणी बाजारातील अशीच एक पोर्तुगीजकालीन इमारत आज कोसळल्याची माहिती समोर आहे.

Building Collapse
CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी उचलला कचरा; साखळीत 'एक तास स्वच्छतेसाठी' या अभियानास प्रारंभ

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच मोडकळीस आलेली ती इमारत कोसळली असल्याचे बोलले जात आहे. अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून भारतीय हवामान विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भूस्खलन आणि पडझडीच्या घटनांमुळे खूप लोकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे.

'त्या' पोर्तुगीजकालीन इमारती मोजताहेत अखेरच्या घटका..

राज्यात अनेक जुन्या इमारती आहेत. बहुतांश इमारती या पोर्तुगीजकालीन असल्यामुळे कोसळण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या इमारती कोसळून काहीजण जखमी झाल्याच्या घटनाही याआधी समोर आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com