
CM Pramod Sawant: सेवा पंधरवड्यात एक तास स्वच्छतेसाठी या अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. साखळी येथे झेंडा दाखवून त्यांनी या अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी परिसरातील फिरून कचरा उचलला. तसेच नागरीकांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, कचरा समस्या गंभीर बनत चालली आहे. राज्यातील विविध प्रकारच्या कचऱ्यासाठी राज्य सरकारला वर्षाला 100 कोटी रूपये खर्च करावे लागतात. कचरा समस्येमुळे सरकारच्या तिजोरीवर अधिक भार पडत आहे.
हा कचरा सरकार तयार करत नाही, तर लोकांकडूनच केला जातो. त्यासाठी प्रत्येकाने आपलख कचरा ही आपली जबाबदारी समजून तो उघड्यावर न टाकता नगरपालिका किंवा पंचायतीकडे द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम आज सर्वत्र जाणवू लागले आहेत. बीयर बाटल्यांच्या कचऱ्याची मोठी समस्या सध्या डोके वर काढत आहे. तसेच आपल्या घरातील सांडपाणी उघड्यावर सोडू नका. नद्या प्रदुषित होणार नाहीत, याची काळजी घ्या.
मुख्यमंत्र्यांनी या परिसरात फिरून कचारा गोळा केला. दुकानदारांशीही संवाद साधून कचरा अस्ताव्यस्त विखरून पडणार नाही, याची काळजी घ्या, अशी सुचना त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर व इतर नगरसेवक. मुख्याधिकारी कबीर शिरगावकर व इतरांची उपस्थिती होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.