क्रेडिट संस्थांचे लवकरच डिजिटायझेशन: सुभाष शिरोडकर

संस्थांचा व्यवहार सेंट्रलाईज्ड झाल्यावर त्यावर देखरेख ठेवणे सोपे होईल
Subhash Shirodkar
Subhash Shirodkar Dainik Gomanatk
Published on
Updated on

पणजी: राज्यात डिजिटायझेशन मोठ्या सुरू असल्याने क्रेडिट व कंझ्युमर संस्थांचेही डिजीटायझेशन केले जाणार आहे. त्यामुळे या संस्थांच्या व्यवहारात पादर्शकता तसेच लोकांना झटपट सुविधाही मिळणार आहेत. या संस्थांचा व्यवहार सेंट्रलाईज्ड झाल्यावर त्यावर देखरेख ठेवणे सोपे होईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

क्रेडिट व कंझ्युमर संस्था राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. बँकांचा सुविधा डिजिटायईज्ड झाल्या आहेत. घरबसल्या बँकांचे व्यवहार करता येतात त्यामुळे या बँकिंग क्षेत्रात टिकून राहण्यासाठी आता क्रेडिट व कंझ्युमर संस्थांनाही या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. या संस्था डीजिटाईज्ड झाल्यास संस्थांचा व्यवहार सुरळीत तसेच गती होणार आहे. त्याचा फायदा या संस्थांच्या गुंतवणूकदार व खातेधारक यांना होणार आहे, असे, मंत्री शिरोडकर म्हणाले.

Subhash Shirodkar
चार्ल्स कुरैया फाऊंडेशनचे आरोप दिशाहीन: गोविंद गावडे

...तर तत्पर सेवा मिळेल

बँकांचे डिजिटायझेन केव्हाच झाले आहे; मात्र क्रेडीट व कंझ्युमर्स संस्थांच्या आर्थिक उलाढाल यामुळे त्यांच्यावर निर्बंध येत होते. डिजिटायझेशन करणे या संस्थांना सध्याच्या स्थितीत आवश्‍यक आहे. ऑनलाईन सेवा उपलब्ध झाली तर या संस्थांच्या खातेधारकांनाही प्रत्यक्षात विविध कामांसाठी संस्थांमध्ये धाव लागणार नाही. त्यामुळे या संस्थांच्या कामालाही गती येईल व लोकांनाही विविध सेवा वेळेत तसेच तत्परपणे मिळू शकतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com