Digambar Kamat: 'स्वतःवर लादलेले अनुशासन हीच यशाची गुरुकिल्ली'

स्वामी विवेकानंदांच्या 160व्या जयंतीनिमित्त गोव्याच्या क्रीडा व युवा व्यवहार खात्याने 12 जानेवारीपासून एक आठवडा ‘राष्ट्रीय युवा सप्ताहाचे’ आयोजन केले आहे.
Digambar Kamat |Goa News
Digambar Kamat |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Digambar Kamat: मडगावच्या रवीन्द्र भवनात शालेय, उच्च माध्यमिक व महाविद्यालीयन विद्यार्थ्यांना ‘युथ अ‍ॅक्टिवेट टॉक’ कार्यक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. स्वतःवर लादलेले अनुशासन, शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

त्याच प्रमाणे उद्योग धंदा, क्रीडा, हॉटेल व्यवस्थापन, राजकारण, व्यवसाय व पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रांमध्ये युवकांना आपली उपजत कलेचा आविष्कार सादर करून जीवनात यशस्वी होण्यास पुष्कळ वाव असल्याचेही सांगण्यात आले. प्रत्येकाने आपल्या लहानपणीचे अनुभव कथन केले व आपण कसे घडलो याची माहिती दिली.

Digambar Kamat |Goa News
Goa News: नार्वे येथे बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका

स्वामी विवेकानंदांच्या 160व्या जयंतीनिमित्त गोव्याच्या क्रीडा व युवा व्यवहार खात्याने 12 जानेवारीपासून एक आठवडा ‘राष्ट्रीय युवा सप्ताहाचे’ आयोजन केले आहे. या उपक्रमाअंतर्गत संचालनालयाने विद्यार्थी व युवकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल मडगावात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार दिगंबर कामत हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

त्याच बरोबर ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, दक्षिण पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया, ग्रॅंडमास्टर अनुराग म्हामल, उद्योजक प्रवीण काकोडे, विमा एजन्ट प्रदीप जोशी, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनॅजमेंटच्या स्नेहा राज व क्रीडा संचालक रोहित कदम उपस्थित होते. नियंत्रकाची जबाबदारी सचिन सुर्लकर यांनी सांभाळली.

आईचे संस्कार व प्राथमिक शिक्षकाच्या संस्कारांमुळेच मुलांची जीवनात जडणघडण होते व स्वतःवर लादलेली शिस्त यश प्राप्तीसाठी महत्त्वाची ठरते, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

आत्ताची मुले खरोखरच भाग्यवान आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक क्षेत्रासाठीच्या सर्व प्रकारच्या साधन सुविधा उपलब्ध आहेत, असे आमदार दिगंबर कामत म्हणाले.

Digambar Kamat |Goa News
Goa Agriculture: धारबांदोड्यातून होणार मधक्रांतीला सुरवात

स्वामी विवेकानंद यांचे मुलांनी चरित्र व त्यांचे साहित्य वाचून त्यातून बोध घेणे गरजेचे आहे. त्यांचे गुण मुलांनी आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. संस्कारातून जो अभ्यास होत असतो तोच जीवनात फलदायी ठरू शकतो.

मुलांनी स्वतःची ताकद समजून घेणे व आपले ध्येय साध्य करण्यासाठी झटणे आवश्यक आहे. आपली स्वप्ने स्वतःकडेच न ठेवता स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करणेही तेवढेच महत्त्वाचे, असे मत मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी स्वता सर्वप्रथम सक्षम बनावे. त्यानंतर यश आपोआप आपल्या मागे येईल. अपयशाने खर्चून न जाता त्यापासून जीवनात सुदृढ बनण्याचा प्रयत्न करावा. कुठल्याही क्षेत्रात शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली असते,असे अभिषेक धनिया म्हणाले.

अभ्यासाबरोबर खेळ हे कठीण असते. तरी सुद्धा उत्सुकता, महत्त्वाकांक्षा, सर्जनशीलता व शिस्त जीवनात महत्त्वाचे आहे, अनुराग म्हामल यांनी सांगितले.

प्रवीण काकोडे, प्रदीप जोशी व स्नेहा राज यांनी आपआपल्या क्षेत्रात युवकांसाठी ज्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्याची माहिती दिली. क्रीडा संचालक रोहित कदम यांनी खात्याच्या उपक्रमांची तसेच सरकारने गोव्यात क्रीडा क्षेत्रात उपलब्ध केलेल्या साधन सुविधांची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com