Vagator Accident News: वागातोर अपघात प्रकरणाला वेगळे वळण! चालकाची अल्कोहोलची पातळी शून्य!

ड्रग्ज चाचणी तसेच त्याच्या चारचाकीची आरटीओ तपासणी होणे बाकी
Vagator Accident News
Vagator Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Vagator Accident News: बेदरकारपणे कारगाडी चालविल्याने झालेल्या अपघातात वागातोरमधील एका रिसॉर्टच्या मालकीणीचा शनिवारी सायंकाळी उशिरा अपघाती मृत्यू झाला होता. या प्रकरणातील अटक केलेल्या संशयित कारचालक सचिन कुरुप (42, आसगाव व मूळ-पुणे) हा घटनेच्या दिवशी दारु पिऊन गाडी चालवत नसल्याचे अल्कोहोल चाचणी अहवालातून शुक्रवारी स्पष्ट झाले. या अपघातात रेमेडिया मेरी अल्बुकर्क (56) ही हॉटेल मालकीण ठार झाली होती.

Vagator Accident News
Chinchinim Death News: रस्त्यात गाय आडवी आली अन् दोन दुचाकींना बसली कारची धडक; एकाचा दुर्दैवी अंत

दरम्यान, कुरुप याने इतर कुठले द्रव्य किंवा अंमलीपदार्थाचे सेवन केले होते का? याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. तसेच, आरटीओकडून अपघाग्रस्त गाडीच्या पाहणीचा अहवाल येणे बाकी आहे.

या अपघातप्रकरणी हणजूण पोलिसांनी यापूर्वीच संशयित आरोपीविरुद्ध भादंसंचे ३०४ कलम जोडले असून, या कारचालकाचा वैध ड्रायव्हिंग परवाना 13 ऑक्टोबर 2022 रोजी तर कारचा विमा गेल्या ऑग्स्ट 2023 मध्ये कालबाह्य झाल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.

शुक्रवारी (ता.27) आरोग्य सेवा संचालनालय, पॅथॉलॉजी विभागाकडून प्राप्त अहवालात संशयित कारचालक कुरुप याच्या अहवालात रक्तातील अल्कोहोलची पातळी शून्य आहे, असे स्पष्ट करण्यात झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com