Sanquelim Municipal Council Election 2023: खिलाडूवृत्तीने धर्मेश सगलानी बनले ‘सिकंदर’

हरले पण जिंकले; विजयी उमेदवारांचे केले मनापासून अभिनंदन; संयम व सहनशीलतेचे घडविले दर्शन
Dharmesh Saglani
Dharmesh SaglaniDainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim Municipal Council Election 2023: साखळी नगरपालिका निवडणुकीचा निकाल बराच धक्कादायक ठरला. ‘टुगेदर फॉर साखळी’ पॅनल तर या निकालाने पूर्णपणे हादरलेच.

तरीसुद्धा आपली हार मान्य करत सर्वांशी दिलखुलास वागणारे या पॅनलचे नेते धर्मेश सगलानी यांच्या खिलाडूवृत्तीने सर्वांची मने जिंकली. आपल्या स्वभावाने ते खरे ‘सिकंदर’ बनले.

साखळीतील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या निवडणूक मतमोजणीवेळी सर्व उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बराच उत्साह दिसून येत होता. मतमोजणी केंद्रात पहिल्या टप्प्यात पाच प्रभागांची मतमोजणी हाती घेतली होती. यावेळी नियम बरेच कडक करण्यात आले होते.

पत्रकारांनाही आत घेतले जात नव्‍हते. त्‍यामुळे आत काय चालले आहे, याचा अंदाज येत नव्हता. एखादा उमेदवार किंवा एजंट बाहेर आल्यास आत काय चालले आहे याची थोडीशी कल्पना मिळत होती.

Dharmesh Saglani
गोव्यात चांदीचा व्यवसाय करून करोडपती व्हायचे स्वप्न; नववीचे दोन विद्यार्थी शाळेतून पळाले, जोधपूरची रंजक घटना

मतमोजणी सुरू होऊन पहिला निकाल प्रभाग क्र. ३ चा आला. उमेदवार सिद्धी प्रभू यांनी स्वतः बाहेर येत आपल्या विजयाची बातमी दिली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या गटात एकच जल्लोष सुरू झाला. तर ‘टुगेदर फॉर साखळी’चे उमेदवार व नेते असलेल्या भागात सर्व काही सामसूम झाले.

तरीही आशा धरून बसलेल्या या पॅनलला दुसरा धक्का बसला तो धर्मेश सगलानी यांच्या पराभवाची माहिती बाहेर येताच.

पदरी पराभव घेऊन बाहेर आलेले धर्मेश सगलानी यांच्या तोंडावर पराभवाचे दुःख दिसून येत होते. परंतु या दुःखाचा त्यांनी आपल्या वागण्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. ते थेट प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.

सर्व प्रश्नांची उत्तरे त्‍यांनी एकदम हसतखेळत व थंड पद्धतीने दिली. आपला पराभव स्‍वीकारून व लोकांनी दिलेल्या कौलाचा आदर करत त्यांनी नवीन पालिका मंडळाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Dharmesh Saglani
Mumbai Goa Highway Accident: वाहतूक कोंडी अन् महाड येथे कोळशाचा ट्रक आणि एसटी बसचा अपघात; सातजण जखमी

मुख्‍यमंत्र्यांच्‍या वडिलांशी संवाद

विजयी नगरसेवक रश्मी देसाई, सिद्धी प्रभू, विनंती पार्सेकर, यशवंत माडकर, रियाझ खान, राया पार्सेकर यांच्‍याशी धर्मेश सगलानी यांनी हस्तांदोलन करून त्‍यांचे अभिनंदन केले. त्यांच्याशी संवादही साधला. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वडील पांडुरंग सावंत यांच्याशीही हस्तांदोलन करीत काही क्षण बातचीत केली.

‘हार-जीत लोकांवर अवलंबून आहे. ते चालतच राहते. आता निवडणूक संपली, आता आम्ही सगळे एक’’ असे पांडुरंग सावंत यांनी सगलानी यांना म्हटले. त्यावर हसतच त्यांनी उत्तर दिले.

माझ्यामुळे त्रास सहन केलेल्यांची मी माफी मागतो

‘टुगेदर फॉर साखळी’ या पॅनलतर्फे गेली दहा वर्षे काम करताना अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले. त्यामुळे या पॅनलवर लोकांचा विश्वास होता. मात्र या निवडणुकीत वेगळेच राजकारण पाहायला मिळाले, जे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.

दबाव, धमक्या, बदलीची भीती, मतदान कोणाला केले आहे ते कळणार, अशा धमक्‍या मतदारांना देण्यात आल्या. त्‍यामुळे अनेकांना तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागला. आपल्यामुळे या लोकांनी खूप काही सहन केले. त्यासाठी आपण या लोकांची माफी मागतो, असे सगलानी यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com