मडगाव : दीड वर्षांपूर्वी चापोली काणकोण येथील सरकारी मालकीच्या धरणावर नग्न अवस्थेतील अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा आरोप असलेल्या वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काणकोण येथील प्रथम वर्ग न्यायालयात काणकोण पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
या प्रकरणी पूनमचा वादग्रस्त पती सॅम बॉम्बे हाही संशयित असून अश्लिल चित्रीकरण प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.(Charge Sheet Filed Against Poonam Pandey in Goa)
आपली वादग्रस्त वक्तव्ये आणि बोल्ड शुट्स यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या पूनम पांडे हिने 2 नोव्हेंबर 2020 मध्ये चापोली धरणावर हा व्हिडीओ शूट केला होता. तिचे पती सॅम यानेच तो शूट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोव्यात एकच गदारोळ माजला होता. त्यानंतर काणकोण पोलिसांनी पूनम व सॅम या दोघांना अटकही केली होती. नंतर ते जामिनावर मुक्त झाले होते.(Poonam Pandey Marathi News)
चापोली धरण ही प्रतिबंधित जागा असल्याने सरकारी जागेत घुसखोरी करून हे चित्रीकरण केल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंते अल्लाबक्ष कुंडगल याने दिली होती.
दरम्यान यापूर्वी याच परिसरात राहत असताना पती सॅम बॉम्बे याने आपल्याला जबर मारहाण करून आपला विनयभंग केला अशी तक्रार काणकोण पोलिसांत दिली होती. मागाहून ती तक्रार पुनमनेच मागे घेतल्याने ही केस बंद करण्यात आल्याची माहिती काणकोण पोलीसांनी दिली.(Goa News)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.