Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Dhargal Hit And Run Case: दोघेजण राहत्या पत्यावर आढळून न आल्याने पोलिसांचा संशय बळावला.
Dhargal Hit And Run Case
Dhargal Hit And Run CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Dhargal Hit And Run Case

धारगळ येथे रिक्षाची स्कूटरला धडक बसून स्कूटरस्वार ठार झाल्याची घटना हा अपघात नसून तो पद्धतशीरपणे केलेला खून आहे, हे पेडणे पोलिसांनी शोधून काढले आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील दोघांना अटकही केली आहे.

स्कूटरस्वार देविदास चंद्रकांत कोनाडकर (५५, दाडाचीवाडी धारगळ) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली रिक्षा (जीए ०३, एन ३६६२) जप्त केली आहे.

धारगळ येथे दोन दिवसांपूर्वी हा अपघात झाला होता. त्यावेळी एका मालवाहू अज्ञात रिक्षाने धडक दिल्याने स्कूटरस्वार कोनाडकर यांचा मृत्यू झाल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला होता. मात्र, अपघातस्थळी पाहणीनंतर पोलिसांना स्कूटरस्वाराला रिक्षाखाली बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत नेल्याचे दिसून आले. हा खूनाचा तर प्रकार नसावा या संशयाने तपासकाम सुरू केले.

स्थानिकांच्या मदतीने रिक्षाची माहिती पोलिसांनी मिळवली. ती रिक्षा कोण चालवत होते, त्याची माहिती पोलिसांना नंतर मिळाली. ते दोघेजण राहत्या पत्यावर आढळून न आल्याने पोलिसांचा संशय बळावला.

पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी हे दोघे तेथेच दडून राहिल्याच्या संशयावरून शेजारील झाडाझुडुपांत शोध घेणे सुरू केले. तेथे ते दोघे काल सापडले. याविषयी हकीगत अशी १२ मे रोजी रात्री ९ वा. या संशयितांनी आपली रिक्षा वळणावर उभी केली आणि त्यामुळे वाहतुकीस अडथळा झाला. कोनाडकर यांनी रिक्षा चालकास त्याचा जाब विचारला.

संशयित त्याच्या अंगावर गेले, तसे कोनाडकर आपली स्कूटर (जीए ११ एफ ३३६८) घेऊन तेथून निघून गेले. संशयितांनी स्कूटरचा पाठलाग करून स्कूटरला धडक दिली आणि कोनाडकर यांना फरफटत नेले.

Dhargal Hit And Run Case
Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

गुन्ह्याची कबुली

या खून प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालक मोहीत कुमार प्रेमपाल सिंग (१९) आणि त्यावेळी रिक्षात असलेला अभिषेक कुमार राजकुमार सिंग (२०, दोघेही रा. विल- बादशापूर, बुलंद शहर, उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास

पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या देखरेखीखाली मोपाचे निरीक्षक नारायण चिमुलकर, निरीक्षक सचिन लोकरे आणि उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर, आशिष पोरोब, प्रवीण शिमेपुरस्कर यांनी तपासकाम केले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून महत्वाचे धागेदोरे पोलिसांना सापडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com