Goa: धनगर समाज सेवा संघाचा वर्धापनदिन साेहळा उत्साहात

गोवा धनगर समाज सेवा संघाचा 32वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
गोवा धनगर समाज सेवा संघ
गोवा धनगर समाज सेवा संघDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa: गोवा धनगर समाज सेवा संघाचा 32 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री रुद्राक्ष उत्पादन सहकारी संस्था सभा मंडप, अनसोले नाणूस येथे कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून भिरोंडाचे सरपंच उदयसिंग राणे, स्थानिक पंचसदस्य रूपाली गावकर, संघटनेचे अध्यक्ष धुळू शेळके, संस्थेचे संस्थापक माजी अध्यक्ष बाबू हुमाणे, कार्याध्यक्ष बाबू झोरे, स्वातंत्र्यसैनिक भैरो वरक, समाजसेवक बाबू खरवत आणि अनसोले गावातील ज्येष्ठ नागरिक बाबू पिंगळे उपस्थित होते.

यावेळी 2021-22 मध्ये 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बिंदिया हुमाणे यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मण झोरे यांनी सूत्रसंचालन केले.

अध्यक्ष धुळू शेळके म्हणाले, समाजबांधवांनी युवा पिढीवर विश्‍वास दाखवून जी जबाबदारी दिली त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. समाजासाठी आम्ही नेहमी कार्यरत राहणार आहोत. आजपर्यंत माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या सहकार्याने विकास झाला.

गोवा धनगर समाज सेवा संघ
Goa Environment: पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास क्रिकेटपटू, अभिनेते जबाबदार!

आता पर्ये मतदारसंघाच्या विद्यमान आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या धडाडीमुळे मतदारसंघातील उर्वरित विकासकामेही पूर्ण होत आहेत. यावेळी सरपंच उदयसिंग राणे, तसेच कार्याध्यक्ष, समाजसेवक व पंच सदस्य यांची भाषणे झाली. संघटनेचे खजिनदार जानू पिंगळे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bhandari Community Goa Chief Minister
Goa Bhandari Community Politics
Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश
Goa Seva Sankalp Campaign 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com